agriculture news in marathi, fuel rate may cut today | Agrowon

पेट्रोलियम दरांत कपातीची आज घोषणा होण्याची अपेक्षा
सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : देशाबाहेर पळालेला मद्यव्यावसायिक विजय मल्ल्या याला देश सोडण्याआधी संसदेत उघडपणे भेटल्याचे आरोप झाल्यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती आहे. रुपयाच्या घरंगळण्याचा क्रम चालूच असून, पेट्रोलियम दरवाढीचा भडका उडाल्यानंतर सामान्यांमधील असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर मोदींनी उद्या (ता. 15) बोलावलेल्या "इकॉनॉमिक फोरम'च्या बैठकीची पार्श्‍वभूमी आजच्या भेटीस असल्याचे सांगितले जाते. उद्याच्या बैठकीअंती पेट्रोलियम दरांत कपात करण्याबाबतची काही घोषणा सरकारच्या पातळीवरून होण्याची अपेक्षा आहे.

नवी दिल्ली : देशाबाहेर पळालेला मद्यव्यावसायिक विजय मल्ल्या याला देश सोडण्याआधी संसदेत उघडपणे भेटल्याचे आरोप झाल्यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती आहे. रुपयाच्या घरंगळण्याचा क्रम चालूच असून, पेट्रोलियम दरवाढीचा भडका उडाल्यानंतर सामान्यांमधील असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर मोदींनी उद्या (ता. 15) बोलावलेल्या "इकॉनॉमिक फोरम'च्या बैठकीची पार्श्‍वभूमी आजच्या भेटीस असल्याचे सांगितले जाते. उद्याच्या बैठकीअंती पेट्रोलियम दरांत कपात करण्याबाबतची काही घोषणा सरकारच्या पातळीवरून होण्याची अपेक्षा आहे.

जेटलींनी मल्ल्याला पळून जाण्याआधी भेटून टिप्स दिल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे. जेटलींनी मल्ल्याला कोणता कानमंत्र दिला याचा पर्दाफाश करण्यासाठी कॉंग्रेसने रोज पत्रकार परिषदा घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. या पार्श्‍वभूमीवर जेटली-मोदी चर्चेत मल्ल्या प्रकरणाला स्पर्श झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र अधिकृतरीत्या "इकॉनॉनमिक फोरम' बैठकीच्या पूर्वसंध्येला देशाच्या अर्थमंत्र्यांची पंतप्रधानांशी चर्चा इतकाच धागा बैठकीच्या खोलीतून बाहेर आला आहे. पेट्रोलियम दरवाढीचा आलेख खाली येण्याची व सामान्यांचा रोष कमी होण्याची चिन्हे नाहीत. असा स्थितीत उद्या पंतप्रधान सामान्यांना दिलासा देण्याच्या उपायांबाबत चर्चा करतील. पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क घटविण्याचा प्रस्ताव सरकारने फेटाळून लावला आहे. गेल्या 42 दिवसांत कच्च्या तेलाच्या आयात शुल्कात तिपटीहून जास्त वाढ झाल्याने व त्याचे दरही वाढत असल्याने सरकारमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

"उज्ज्वला'सारख्या मोदींच्या जिव्हाळ्याच्या योजना वगळता इतर योजनांवरील सरकारी खर्च घटवून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. 2013 मध्ये यूपीए सरकारने परकीय गंगाजळीत वाढ करण्यासाठी प्रवासी भारतीयांसाठी बॉंड जारी केले होते त्याचा परतावा मोदी सरकारला 2016-17 मध्ये करावा लागला होता. आता खुद्द मोदी सरकार तशाच योजनेवर विचार करत असल्याचीही माहिती आहे. 

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...