agriculture news in marathi, full Moon eclipse will be on 31jan | Agrowon

माघी पौर्णिमेला बुधवारी खग्रास चंद्रग्रहण
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

पुणे  ः ‘‘माघी पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे. भारतासह आशिया, अमेरिका, युरोपच्या ईशान्येकडील प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील खगोलप्रेमी नागरिकांना हे ग्रहण पाहता येईल. बुधवारी (ता. ३१) सायंकाळी पाच वाजून १८ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल. मात्र सूर्यास्तानंतर काही मिनिटांनी ग्रहण लागलेले चंद्रबिंब झाकलेल्या अवस्थेत दिसायला लागेल. संपूर्ण भारतात एक तास १७ मिनिटे हे ग्रहण पाहायला मिळेल,’’अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. 

पुणे  ः ‘‘माघी पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे. भारतासह आशिया, अमेरिका, युरोपच्या ईशान्येकडील प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील खगोलप्रेमी नागरिकांना हे ग्रहण पाहता येईल. बुधवारी (ता. ३१) सायंकाळी पाच वाजून १८ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल. मात्र सूर्यास्तानंतर काही मिनिटांनी ग्रहण लागलेले चंद्रबिंब झाकलेल्या अवस्थेत दिसायला लागेल. संपूर्ण भारतात एक तास १७ मिनिटे हे ग्रहण पाहायला मिळेल,’’अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. 

भारतात पूर्वांचलाकडील काही प्रदेश वगळता सर्वत्र खग्रास अवस्था पाहायला मिळेल. ग्रहण लागल्यावर सायंकाळी सहा वाजून २१ मिनिटांनी चंद्रबिंब झाकोळलेले दिसू लागेल. सायंकाळी सात वाजून ३८ मिनिटांनी खग्रास अवस्था संपेल तरीही ग्रहण सुरू राहील. रात्री आठ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण संपेल. बुधवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरू होत असून, ग्रहण संपेपर्यंत वेध पाळावेत.

माघ महिन्यातील पौर्णिमेच्या कुलधर्म-कुलाचाराचे धार्मिक कार्यक्रम, पूजन वेधकाळातही करता येतील. त्यामुळे सूर्योदयापासून दुपारपर्यंत (माध्यान्यवेळ) पूजादी विधी करावेत. या दिवशी अनेक गावांमध्ये यात्रा, उत्सव, पालखी मिरवणूक आदी धार्मिक कार्यक्रमही असतात. प्रथेप्रमाणे सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे कार्यक्रम करावेत, असेही पंचांगकर्ते मोहन दाते यांनी कळविले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...