ताज्या घडामोडी
सांगली : कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव या तालुक्यांतील शेतीला वरदान ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेसाठी अजून २०० कोटींची गरज आहे. मात्र, केवळ २५ कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. योजनेच्या कामावर २०१७-१८ या वर्षात फक्त २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पण, या निधीतून ही योजना पूर्णत्वाकडे जाणार नाही.
सांगली : कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव या तालुक्यांतील शेतीला वरदान ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेसाठी अजून २०० कोटींची गरज आहे. मात्र, केवळ २५ कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. योजनेच्या कामावर २०१७-१८ या वर्षात फक्त २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पण, या निधीतून ही योजना पूर्णत्वाकडे जाणार नाही.
ताकारी उपसा योजनेवर शासनाने आजअखेर ६८८ कोटींचा खर्च केला आहे. तरीही अजून योजना पूर्ण होण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी गरजेचा आहे.
ताकारी योजनेच्या कामांवर शासनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला; पण योजना अजूनही अपूर्ण आहे. गेल्या ३५ वर्षांपासून योजनेची कामे चालू आहेत; मात्र तेव्हापासून योजनेचा विस्तारही वाढत गेला आहे. प्रत्येक नेत्याने आपल्या मतदारसंघातील हक्काची गावे ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या या योजनेत चार तालुक्यांतील ५१ गावांतील शेतीचा समावेश आहे. तासगाव व खानापूर तालुक्यांतील अनेक गावांत कालवा खोदाईची कामे गतीने चालू आहे. कडेगाव तालुक्यातील तडसर, हिंगणगाव खुर्द येथील कालवा, पोटकालव्याची कामे चालू आहेत. पलूस-खानापूर तालुक्यांतील गावांचा समावेश असलेली नवीन वितरिकांवरील कामेही चालू आहेत.
या योजनेच्या माध्यमातून १०८ किलोमीटरपर्यंतच्या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. या परिसरातही कालवा दुरुस्ती, पोटपाट खोदाई, दारे बसविणे यांसह विविध कामे अपूर्ण आहेत. यावरही शासनाने खर्च करणे गरजेचे आहे. अपूर्ण कामे जलदगतीने पूर्ण न केल्यामुळे ताकारी योजनेची आर्थिक तरतूद दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
ही योजना पूर्ण करण्यासाठी मोठ्या नेत्यांनी शेकडो कोटींच्या घोषणा केल्या. मात्र, या योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या घोषणा खोट्या ठरताना दिसत आहेत. ताकारी योजनेचा कालवा, पोटकालवा खुदाई, दारे बसविणे यांसह विविध कामे पूर्ण होण्यासाठी व शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी देण्यासाठी अजून २०० कोटींची गरज असल्याची माहिती ताकारी उपसा सिंचन योजनेच्या सूत्रांनी दिली.
- 1 of 347
- ››