agriculture news in marathi, A fund of Rs. 200 crore falls under Jalgaon Zilla Parishad | Agrowon

जळगाव जिल्हा परिषदेत २०० कोटींचा निधी पडून
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

जळगाव : जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वाद आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीचे नियोजन अजूनही झालेले नाही. सुमारे २०० कोटी रुपये निधी पडून आहे. २०१८-१९ या वित्तीय वर्षात कामे मार्गी लागतील कशी, हा मुद्दा असून, त्याचा ग्रामविकासावर परिणाम होईल, असे चित्र आहे.

जळगाव : जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वाद आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीचे नियोजन अजूनही झालेले नाही. सुमारे २०० कोटी रुपये निधी पडून आहे. २०१८-१९ या वित्तीय वर्षात कामे मार्गी लागतील कशी, हा मुद्दा असून, त्याचा ग्रामविकासावर परिणाम होईल, असे चित्र आहे.

भजनी मंडळांसाठी साहित्य वितरण, बाकखरेदीच्या निविदा लटकल्या आहेत. याबाबत विरोधकांची न्यायालयात जाण्याची भूमिका आहे. लघुसिंचन, आरोग्य, बांधकाम, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन आदी विभागांशी संबंधित योजनांसाठी निधी खर्च होत नसल्याची स्थिती आहे. फेब्रुवारीत निवडणुकांची आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे विकासकामांचे उद्‌घाटन, त्यासंबंधीचे निर्णय जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये घेणे शक्‍य होणार नाही. हे माहीत असूनही सत्ताधारी आपापसांतील मतभेद, वादामुळे कार्यवाही करीत नाहीत. विरोधकांना विश्‍वासात घेत नाहीत, असा दावा काही सदस्यांनी केला आहे.

मागील वर्षीदेखील निधीचे नियोजन रखडल्याने निधी खर्च झाला नाही. वित्त विभागाकडे फायली साचल्या. कंत्राटदारांना वणवण फिरविले जाते. जलयुक्तच्या कामांची गती नाही. ज्या योजनांना निधी नाही, त्याची ओरड सत्ताधारी करतात. मात्र, प्राप्त निधी खर्च करण्याची प्रक्रिया होत नाही. ती सुरू झाल्यानंतर किमान दोन महिने अंतिम मंजुरीला लागतील. आताच नियोजन पूर्ण करावे. जिल्हा परिषदेतील स्थायी समितीची सभा केवळ सदस्य गैरहजर असल्याने नुकतीच तहकूब करण्यात आली. अशा प्रकारांमुळे निर्णयप्रक्रिया कशी पार पडेल, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला आहे.

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...