agriculture news in marathi, fund sanction for agriculture scheme, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्याकरिता `आत्मा`साठी पावणेचार कोटींचा निधी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे  ः शेतीतील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) भर देण्यात येणार आहे. यंदा पुणे जिल्ह्यात आत्मा योजनांच्या अंमलबजावणीसाठी तीन कोटी ८७ लाख ८ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे, अशी माहिती आत्मा विभागातील सूत्रांनी दिली.

पुणे  ः शेतीतील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) भर देण्यात येणार आहे. यंदा पुणे जिल्ह्यात आत्मा योजनांच्या अंमलबजावणीसाठी तीन कोटी ८७ लाख ८ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे, अशी माहिती आत्मा विभागातील सूत्रांनी दिली.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) योजनांच्या अंमलबजावणीसाठी चार कोटी ३६ लाख ९३ हजार रुपयांचा आर्थिक आराखडा एप्रिल महिन्यात प्रस्तावित केला होता. त्यानंतर मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य समितीमार्फत केंद्र शासनाला पाठविला होता. केंद्र शासनाने हा प्रस्तावित आराखड्यात तरतूद केलेला निधी कमी करून तीन कोटी ८७ लाख ८ हजार रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या निधीतून शेतीविषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेसाठी तीन कोटी ५९ लाख ७ हजार रुपयांचा आर्थिक आराखडा प्रस्तावित केला होता. यंदा त्यामध्ये ७७ लाख ८६ हजार रुपयांची वाढ केली असून, चार कोटी ३६ लाख ९३ हजार रुपयांचा आर्थिक आराखडा प्रस्तावित केला. मात्र, गेल्या वर्षी मार्च २०१८ अखेर दोन कोटी ३८ लाख २६ हजार रुपये खर्च झाले होते. उर्वरित निधी चालू वर्षी खर्च करण्यात येत आहे. चालू वर्षी मंजूर केलेल्या आराखड्यातील निधीत केंद्र हिस्सा ६० टक्के, राज्य हिस्सा ४० टक्के आहे.   

यासाठी निधी होणार खर्च

  • प्रात्यक्षिके. शैक्षणिक सहली.
  • शेतकरी गट संघटन.
  • शेतकरी गटांना पारितोषिके प्रदान करणे.
  • चांगली कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसे प्रदान करणे.
  • जिल्हास्तरीय प्रदर्शने, कृषी मेळावे आयोजित करणे.
  • माहिती प्रसार व प्रचार, शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद, शास्त्रज्ञ व कृषी विस्तार अधिकारी यांच्या संयुक्त भेटी, किसान गोष्टी उपक्रमांचे आयोजन.
  • कृषी विज्ञान केंद्र व इतर संस्थांकडून संशोधनाच्या माध्यमातून आलेल्या शिफारशीचा अवलंब, शेती शाळा आयोजित करणे.
  • आकस्मिक खर्च, जिल्हास्तर व तालुकास्तरवरील प्रवास खर्च.
  • जिल्हास्तरीय आत्मा प्रशिक्षण संस्थेस साह्य.
  • शेतकरी मित्र, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...