कपाशी नुकसानीपोटी मराठवाड्यासाठी ४०७ कोटींचा निधी मंजूर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे नुकसान झाल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना भरपाईपोटी मंजूर रकमेपैकी दुसरा हप्ता देण्यासाठी शासनाने ४०७ कोटी १ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दुसऱ्या हप्त्याच्या निधीसह आधीच्या हप्त्यातील उर्वरित निधीचे लवकरच वितरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठवाड्यात गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे नुकसान झाले. त्याच्या नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना १ हजार २२१ कोटी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. शासनाने त्यातील पहिला हप्ता म्हणून ४०७ कोटी १ लाख रुपये वितरणाला मंजुरी दिली होती. आता पुन्हा ४०७ कोटी १ लाख रुपयांच्या दुसऱ्या हप्ताचे वाटप करण्यालाही शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच हा निधी वाटप होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२०१७ मधील खरीप हंगामात मराठवाड्यातील एकूण ४७ लाख ७० हजार २०० हेक्‍टरपैकी १५ लाख ८२ हजार ६७९ हेक्‍टरवर कापूस पीक घेण्यात आले होते. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश कपाशी हातची गेली; तर धान पिकांवर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाले होते. मराठवाड्यातील २६ लाख ९० हजार ९३९ शेतकऱ्यांसाठी १ हजार२२१ कोटी ४ लाख रुपयांची नुकसानभरपाईची शासनाकडून मिळणार होती.

त्यापैकी मे महिन्यात ४०७ कोटी एक लाखाचा पहिला हप्ता देण्यात आला. त्याचे शेतकऱ्यांना वाटप झाल्यानंतर ४०७ कोटी १ लाखाचा दुसरा हप्ता वितरणाला शासनाने १२ जुलैला मंजुरी दिली. पहिल्या हप्त्यातील उर्वरित व दुसऱ्या हप्त्याचे मिळून ४८८ कोटी ४२ लाख वितरित करण्यात येणार आहे. दुसऱ्या हप्त्याची रक्कम वाटप झाल्यानंतर तिसरा हप्ता मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील धान व कपाशी उत्पादकांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने दुसऱ्या हप्त्यात १३५० कोटी ६ लाख ५० हजार रुपये मंजूर केले आहेत.

जिल्हानिहाय नुकसानभरपाईची रक्‍कम

औरंगाबाद  ९८ कोटी ७५ लाख
जालना ९१ कोटी ७९ लाख
परभणी  ५२ कोटी ६६ लाख
हिंगोली १२ कोटी २० लाख
नांदेड  ५८ कोटी ७१ लाख
बीड  ८५ कोटी ५३ लाख
लातूर २ कोटी ८७ लाख
उस्मानाबाद    ४ कोटी ५० लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com