agriculture news in marathi, fund sanction for water conservation scheme, pune, maharashtra | Agrowon

जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११ कोटी ९२ लाखांचा निधी मंजूर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी निवडलेल्या २१३ गावांमधील जलसंधारणाची कामे करण्याकरिता जलसंधारण विभागाने जिल्ह्यासाठी ११ कोटी ९२ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी निवडलेल्या २१३ गावांमधील जलसंधारणाची कामे करण्याकरिता जलसंधारण विभागाने जिल्ह्यासाठी ११ कोटी ९२ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

या वर्षात निवड झालेल्या २२३ गावांमध्ये नाला खोलीकरण, सिमेट बंधारे, समतल चर, कपार्टमेंट बंडिंग या व इतर स्वरूपाची जलसंधारणाची कामे सरकारच्या जलसंधारण, वन, कृषी व जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून सुरू आहेत. मात्र जानेवारीपासून निधीअभावी यातील अनेक कामे रखडली होती. सरकारने १२ एप्रिलच्या शासन निर्णयाच्या जिल्ह्यातील २२३ गावांमधील जलसंधारणाच्या कामासाठी पाच कोटींचा निधी वितरित केला होता. मात्र तरीही जलसंधारणाच्या कामांना अपेक्षित वेग आला नव्हता. म्हणूच ही बाब विचारात घेऊन जलसंधारण

विभागाने १ मार्च २०१९ च्या शासन निर्णयाच्या आधारे या अभियानअंतर्गत निवडलेल्या २२३ गावांमधील कामे पूर्ण करण्यास ३१ डिसेंबर २०१९ अखेर मुदतवाढ दिली आहे. या कामांना अधिक गती देण्यासाठी १० मेच्या शासन निर्णयाच्या आधारे जिल्ह्याला या कामांसाठी ११ कोटी ९२ लाखांचा निधी मंजूर करून हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा निधी जलसंधारणाची कामे करीत असलेल्या सरकारच्या सर्व यंत्रणांना कामनिहाय वितरित केला जाणार आहे. जिल्ह्याला उपलब्ध झालेल्या या निधीबाबतचे आदेश या विभागाच्या अवर सचिवांनी १० मेच्या शासन निर्णयाच्या आधारे या संबंधित सर्व कार्यालयाला दिले आहेत. निधी उपलब्धतेमुळे यापुढील काळात या कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...