agriculture news in marathi, fund for sugarcane chop workers cooperation, beed, maharashtra | Agrowon

ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी ः पंकजा मुंडे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच लाख घरे बांधली, आमच्या सरकारने दोन वर्षांत दोन लाख ६२ हजार घरे बांधली. दुष्काळी पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार योजना राबविल्याचे परिणाम दिसत आहेत. बीड जिल्ह्यात चार वर्षांत एकही टँकर सुरू करावा लागला नाही. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने सुरू होत असलेल्या ऊसतोड मजूर महामंडळासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल. मजुरांना योजनांसह बैलजोडी आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी त्यातून कर्ज मिळेल असे, प्रतिपादन ग्रामविकास, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच लाख घरे बांधली, आमच्या सरकारने दोन वर्षांत दोन लाख ६२ हजार घरे बांधली. दुष्काळी पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार योजना राबविल्याचे परिणाम दिसत आहेत. बीड जिल्ह्यात चार वर्षांत एकही टँकर सुरू करावा लागला नाही. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने सुरू होत असलेल्या ऊसतोड मजूर महामंडळासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल. मजुरांना योजनांसह बैलजोडी आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी त्यातून कर्ज मिळेल असे, प्रतिपादन ग्रामविकास, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

सावरगाव (ता. पाटोदा) येथे गुरुवारी (ता. १८) आयोजित दसरा मेळावा आणि संत भगवानबाबा यांच्या स्मारक लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, करवीर पिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, संत तुकाराम महाराज यांचे वंशज संभाजी महाराज मोरे, शांतीगिरी महाराज, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, नांदेडच्या गुरुद्वाराचे ज्ञानी सरबजितसिंगजी, संत नामदेव महाराज यांचे वंशज महादेव महाराज नामदास, नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, आमदार सुरेश धस, भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार, आर. टी. देशमुख, शिवाजी कर्डिले, सुरजितसिंह ठाकूर, मोनिका राजळे, स्नेहलता काजळे, मोहन फड, नरेंद्र दराडे, विनायक पाटील, प्रज्ञाताई मुंडे, भागवत कराड, रमेश आडसकर उपस्थित होते. या वेळी ज्ञानेश्वरी वाचत असलेली संत भगवान बाबा यांची २५ फूट मूर्ती असलेल्या स्मारकाचे लोकार्पण करून त्याला भगवान भक्तिगड असे नामकरण करण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...