agriculture news in marathi, funds sanction for jalyukt shivar scheme in pune region,maharashtra | Agrowon

पुणे विभागात ‘जलयुक्त’साठी १५४ कोटींचा निधी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 जून 2018

पुणे  ः पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान राबविण्यासाठी यंदा पुणे विभागात ५९९ गावे निवडण्यात आली असून, या गावांकरिता शासनाने १५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या गावात जलसंधारणाची कामे वेगाने होण्यास मदत होणार आहे.

पुणे  ः पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान राबविण्यासाठी यंदा पुणे विभागात ५९९ गावे निवडण्यात आली असून, या गावांकरिता शासनाने १५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या गावात जलसंधारणाची कामे वेगाने होण्यास मदत होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून विभागातील सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंट बंधारे, नालाबंधाऱ्याची कामे, नाला खोलीकरण, रुंदीकरण, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करणे अशी विविध कामे करण्यात येत आहेत.

यंदा निवडलेल्या गावांतील प्रतिनिधींना गावाचे आराखडे तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानंतर संबधित गावांचे आराखडे तयार करण्यात येऊन या गावांत ‘जलयुक्त’ची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे भविष्यातील पाणीप्रश्न काहीसा कमी होणार आहे.

२०१६-१७ मध्ये विभागातील ८२५ गावे या अभियानासाठी निवडली होती. त्यामध्ये ४९  हजार ५४३ कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी ४८ हजार ६७६ कामे पूर्ण झाली असून ८६७ कामे प्रगतिपथावर आहेत. त्यावर ६७३ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. २०७१-१८ मध्ये ८२३ गावांची निवड करण्यात आली होती.

या गावामध्ये एकूण २७ हजार २०० कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी १६ हजार १३० कामे पूर्ण झाली असून ७ हजार ७३९ कामे प्रगतिपथावर आहेत. त्यावर १०२ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. चालू वर्षी निवडलेल्या गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी किवा पावसाळ्यानंतर कामे केली जाणार आहेत. त्यासाठी मंजूर झालेला निधी खर्च करण्यात येणार आहे; तसेच पूर्वीच्या रखडलेल्या कामांसाठीही हा निधी वापरता येणार आहे, अशी माहिती पुणे विभागीय कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
 

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवडलेली गावे व मंजूर निधी (रुपये)
जिल्हा  निवडलेली गावे   मंजूर निधी (कोटी रुपये)
पुणे २१९  ४१
सातारा ९० ३७
सांगली ९२ २१
सोलापूर  ११८ ४६
कोल्हापूर ८० 
एकूण ५९९  १५४

 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...