agriculture news in marathi, funds will not fall short for Drought, CM | Agrowon

दुष्काळ निवारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही ः मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

सांगली ः राज्य शासनाने १८० तालुक्‍यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. दुष्काळ निवारण्यासाठी निधीची कमतराता भासू दिली जाणार नाही. मात्र, राज्यातील टंचाई निवारणाबाबत राजकीय हेतूने राज्यात विरोधक दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत आहेत. राज्यात आघाडी सरकार असताना त्यांनीच दुष्काळ हा शब्द हद्दपार केला होता. आम्ही त्यात सुधारणा करून दुष्काळसदृश परिस्थिती अशी सुधारणा केली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राज्यात दुष्काळसदृश नव्हे दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली होती.

सांगली ः राज्य शासनाने १८० तालुक्‍यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. दुष्काळ निवारण्यासाठी निधीची कमतराता भासू दिली जाणार नाही. मात्र, राज्यातील टंचाई निवारणाबाबत राजकीय हेतूने राज्यात विरोधक दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत आहेत. राज्यात आघाडी सरकार असताना त्यांनीच दुष्काळ हा शब्द हद्दपार केला होता. आम्ही त्यात सुधारणा करून दुष्काळसदृश परिस्थिती अशी सुधारणा केली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राज्यात दुष्काळसदृश नव्हे दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली होती. त्याचा नामोल्लेख टाळून मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या काळात टंचाईसदृश स्थिती जाहीर करणाऱ्या विरोधकांवर टीका केली.

गेल्या चार वर्षांत जलयुक्त शिवारमधून मोठ्या प्रमाणात कामे झाली. त्यामुळे भूजलपातळीत वाढ झाली. मात्र, गेल्या दोन वर्षांत पाऊस कमी पडल्याने शेतीसाठी पाण्याचा उपसा जास्त झाल्याने पातळी घटली आहे. असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. २४) येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. २४) आज आढावा बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यास सरकार कटिबद्ध आहे. राज्य सरकार आठ प्रकारच्या दुष्काळी सुविधांसाठी निधी कमी पडून देणार नाही. जिल्ह्यातील सात तालुक्‍यांत राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. जिल्ह्यातील ६६ मंडळांपैकी ११ मंडळांत ५० टक्के, तर एका मंडळात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मुगाचे उत्पादन घटले असल्याचे अहवालात दिसते आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘जिल्ह्यातील ३२३ गावांत टंचाई निर्माण होऊ शकते. मात्र, ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि आरफळ या योजनांतून पाझर तलाव भरून घेण्याचे आदेश दिले आहे. उर्वरित १२३ गावांत प्रशासनाने विविध उपाययोजना केलेल्या आहेत. चाराटंचाईवर मात करण्यासाठी २८२३ हेक्‍टरवर मका पेरणी होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले

  •     जलयुक्त शिवारबाबत जिल्ह्याची प्रगती चांगली
  •     कृष्णा खोरेसाठी ९१६० कोटींचा निधी उपलब्ध
  •     टेंभूसाठी ४९६८ कोटींचा निधी दिला
  •     टेंभूचा चौथा टप्पा डिसेंबरअखेर लोकार्पण करणार
  •     टेंभूचा पाचवा टप्पा मार्चपर्यंत पूर्ण होईल
  •     वाकुर्डेच्या अपूर्ण कामांना ५० कोटी रुपयांचा निधी देणार

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...