agriculture news in marathi, The future of banana is available on water availability | Agrowon

केळी लागवडीचे भवितव्य पाण्याच्या उपलब्धतेवर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

नांदेड  ः जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्राचे भवितव्य इसापूर धरणातील पाणीसाठा उपलब्धतेवर अवलंबून आहे. सध्या या धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; परंतु सद्यस्थितीत कोसळलेले दर आणि उघडलेला पाऊस त्यामुळे केळी लागवड करावी की नाही या विचारात शेतकरी आहेत. पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे तुलनेने कमी पाण्यावर येणाऱ्या हळद या नगदी पिकांकडे शेतकरी वळत आहेत. त्यामुळे केळीचे क्षेत्र कमी होत आहे. विहिरीद्वारे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी सध्या केळी लागवड सुरू केली आहे.

नांदेड  ः जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्राचे भवितव्य इसापूर धरणातील पाणीसाठा उपलब्धतेवर अवलंबून आहे. सध्या या धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; परंतु सद्यस्थितीत कोसळलेले दर आणि उघडलेला पाऊस त्यामुळे केळी लागवड करावी की नाही या विचारात शेतकरी आहेत. पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे तुलनेने कमी पाण्यावर येणाऱ्या हळद या नगदी पिकांकडे शेतकरी वळत आहेत. त्यामुळे केळीचे क्षेत्र कमी होत आहे. विहिरीद्वारे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी सध्या केळी लागवड सुरू केली आहे.

नांदेड जिल्ह्यात केळीचे सरासरी क्षेत्र ९ ते १० हजार हेक्टर पर्यंत आहे. अर्धापूर, नांदेड, मुदखेड, हदगांव, मुदखेड या तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यातही अर्धापूर तालुका राज्यात केळीसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी साधारणपणे जून ते आॅगस्ट महिन्यात केळी लागवड केली जाते. केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना इसापूर धरणाच्या कालव्याच्या पाण्याचा लाभ होते. अर्धापूर तालुक्यातील काही भागात सिद्धेश्वर (जि. हिंगोली) धरणाच्या कालव्याचा लाभ होतो. गतवर्षी जून महिन्यात लागवड केल्यानंतर जुलै-आॅगस्टमध्ये आलेल्या पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे लागवड केलेल्या केळी उपटून टाकाव्या लागल्या. इसापूर आणि सिद्धेश्वर धरणांमध्ये पुरेशाप्रमाणात पाणीसाठा उपलब्ध न झाल्यामुळे पाणी आवर्तने मिळाली नव्हती. विहिरीवर जोपासलेल्या केळी बागा मे महिन्यात पाणी कमी पडल्यामुळे होरपळून गेल्या. केळी बागा जोपासण्यासाठी कष्ट घेतले, परंतु सध्या दर कोसळेले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक अडचणीत आहेत.

विहिरीला पाणी असल्यामुळे यंदा दोन एकर केळी लागवड केली. गतवर्षीपेक्षा कमी लागवड केली आहे. उन्हाळ्यात केळी जोपासण्यासाठी कष्ट घेतले. परंतु आता भाव खूप कमी झाल्यामुळे नुकसान होत आहे.
- बाळू माटे, केळी उत्पादक, अर्धापूर, जि. नांदेड

गतवर्षी जुलैमध्ये केळी लागवड केली होती. कमी पाण्यामुळे यंदा दोन एकर हळद लागवड केली. इसापूर धरण ४० टक्केपर्यंत भरल्याशिवाय यंदा केळी लागवड करायची नाही.
- ज्ञानेश्वर माटे, केळी उत्पादक, अर्धापूर, जि. नांदेड.

मंदीमुळे सध्या केळी लागवड करावी की नाही, या विचारात शेतकरी आहेत. इसापूर कालव्यामुळे सिंचनाची सोय होते. पण धरण भरल्याशिवाय खात्री नाही. पाण्याच्या उपलब्धतेनुसार यंदा केळी लागवड मागे-पुढे होऊ शकते.
- प्रभाकर गव्हाणे,
केळी उत्पादक, नागेली, ता. मुदखेड, जि. नांदेड.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...