agriculture news in marathi, The future Mhaisal Irrigation Scheme in dark | Agrowon

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे भवितव्य अंधारमय
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जानेवारी 2018

सांगली : मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्‍यांना वरदान ठरणारी म्हैसाळ उपसा सिंचन योजना ही वीजबिल व पाणीपट्टीच्या चक्रात अडकली आहे. या योजनेचे वीजबिलाचे ३४ तर पाणीपट्टीचे ७४ कोटी रुपये थकलेले आहेत. त्यामुळे ही योजना सुरू होण्याची शक्यता कमी असून, तिचे भवितव्य अंधारमय दिसत आहे.

सांगली : मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्‍यांना वरदान ठरणारी म्हैसाळ उपसा सिंचन योजना ही वीजबिल व पाणीपट्टीच्या चक्रात अडकली आहे. या योजनेचे वीजबिलाचे ३४ तर पाणीपट्टीचे ७४ कोटी रुपये थकलेले आहेत. त्यामुळे ही योजना सुरू होण्याची शक्यता कमी असून, तिचे भवितव्य अंधारमय दिसत आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजना दुष्काळी भागाला वरदान ठरणारी आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे आजही तलाव, ओढ्यांना पाणी आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई नाही, असे वाटते आहे. मात्र, दुष्काळी भागात पाणीटंचाई सुरू झाली आहे. टंचाईच्या काळात ही योजना सुरू केली होती. या काळातील वीजबिलाची रक्कम शासन देणार आहे. पंरतु पाणीपट्टी वसुलीसाठी पाटबंधारे विभागाने कोणत्याच हालचाली केलेल्या दिसत नाहीत.

या योजनेचे पाणी ज्या भागातील शेतकऱ्यांना मिळाले त्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टीदेखील भरली आहे. मात्र, ही योजना सुरू झाल्यापासून शेवटच्या गावापर्यंत पाणीच पोचले नाही. त्यामुळे पाणीपट्टी देणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. एका बाजूने शेतकऱ्यांची भूमिका योग्य असली तरी, त्यावर पाणीपट्टीचा मार्ग काढण्यासाठी आज कोणीही पुढे आलेले नाही.

म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी वीजबिलाच्या ५० टक्के म्हणजे १७ कोटी रुपये भरणे अत्यावश्‍यक आहे. तरच ही योजना सुरू होईल. परंतु या योजनेचे पाणी वाटपाचे नियोजनच नसल्याने शेतकरी पाणीपट्टी भरण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पाणीवाटपाचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

म्हैसाळची पाणीपट्टी ७१ कोटींवर
वास्तविक योजना सुरू झाल्यानंतर त्याचे योग्य नियोजनच झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत आणि या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणीच मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी पाणीपट्टी भरण्यास नकार देत आहेत. मुळात या योजनेचे पाणीवाटपाचे नियोजन काटेकोर होणे गरजेचे आहे, तरच शेतकऱ्यांना पाणी मिळेल. पण पाटबंधारे याचे नियोजनच करत नाही. यामुळे या योजनेची थकबाकी वाढतेय. या योजनेची पाणीपट्टीची थकबाकी ७१ कोटींवर पोचली आहे.

लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रातील अगोदरच पिके पाण्याविना वाळून जाऊ लागली आहेत. पण पुढील काळात पिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी ही योजना सुरू केली पाहिजे. म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतीला पाणी मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे; तर द्राक्ष, डाळिंब बागेला पाणी मिळेल.

 

इतर बातम्या
हमीभावाने साखर खरेदीसाठी हवी तरतूदराज्यातील साखर कारखान्यांमध्ये लाखो टन पोती साखर...
अर्थसंकल्प समजून घेताना..अर्थसंकल्प म्हणजे सरकारने आगामी आर्थिक वर्षातील...
कृषी, पूरक उद्योगांसाठी विशेष तरतुदींची...आकडेवारीच्या खेळामध्ये न अडकता अर्थसंकल्पाच्या...
कर, अनुदान, उत्पादन दर्जा या बाबींमध्ये...सूक्ष्मसिंचन प्रणालीने शेती उत्पादनात पर्यायाने...
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारला यावी...गाव विकासाचा आराखडा करताना पाणी केंद्रस्थानी...
शेतकरी उत्पादक संघांना 'स्टार्टअप'चा...राज्यातील शेतकरी उत्पादक संघांना स्टार्टअप...
मुबलक वीज; पण यंत्रणा अद्ययावत नाहीशेतकऱ्यांच्या दृष्टीने शासनाने जाहीर केलेल्या...
ग्रामविकासच्या अार्थिक तरतुदींत वाढ...राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात ग्रामविकास विभागाचा...
सहकारातील त्रिस्तरीय बॅंकिंग व्यवस्थेला...राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची...
अवजार उद्योगाला अर्थसंकल्पात प्रोत्साहन...अवजार क्षेत्राबाबत अनेक महिन्यांपासून शासन...
दुग्ध व्यवसायासाठी हवा स्वतंत्र निधीगेल्या वर्षभरात दूध व्यवसाय मोठ्या संकटाला तोंड...
‘पोल्ट्री’च्या वाढीसाठी हवे ठोस सरकारी...दुष्काळी भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांना उद्योजकतेची...
आधुनिक हरितगृह शेतीला भरघोस तरतुदींची...प्रचंड भांडवली गुंतवणूक असलेल्या हरितगृह...
पीकसंरक्षणातील खर्च कमी करायला हवायवतवाळ जिल्ह्यात कीडनाशक विषबाधेची जी गंभीर घटना...
राज्याचाही पिकांना दीडपट हमीभाव?मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील...
केवळ विदर्भातच थंडीपुणे : हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे....
शेतीमाल मूल्यसाखळी मजबुतीसाठी ठोस धोरण...शेतीमालाचे उत्पादन, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि...
पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरीपुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक...
माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन नगर  :  कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष माजी...
मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या...