आंबा रस आटविण्यासाठी गॅसिफायर

आंब्याचा रस आटवण्यासाठी विकसित केलेला गॅसिफायर
आंब्याचा रस आटवण्यासाठी विकसित केलेला गॅसिफायर

कोकणात अजूनही आंबा आटवण्यासाठी चुलीमध्ये लाकडाचा वापर केला जातो. या लाकडाला पर्याय म्हणून तांदळाच्या भुश्याचा वापर गॅसिफायरच्या माध्यमातून करणे शक्य आहे.   गॅसिफिकेशन प्रक्रियेमध्ये प्राणवायू आणि हवेच्या संयोगाने इंधन म्हणून वापरलेल्या जैविक घटकाचे ज्वलन होऊन गॅसमध्ये रूपांतर होते. आमरस आटवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा चांगल्याप्रकारे उपयोग करता येतो. यामध्ये आपण इंधन म्हणून लाकूड, कचरा, पाला-पाचोळा, तांदळाचा भुस्सा याचा वापर करणे शक्य आहे. कोकणाचा विचार करता उपलब्ध तांदळाच्या भुशाचा वापर गॅसिफायरमध्ये इंधन म्हणून करणे शक्य आहे. गॅसिफायरची तांत्रिक रचना ः

  • व्यास ः २० सें. मी.
  • उंची ः १३५ सें. मी.
  • आमरस आटवण्यासाठी पातेल्याची क्षमता ः २० किलो
  • हवेचा दाब ः ३.५ मीटर घन/तास
  • फॅन साठी १० वॅट सौर प्लेट
  • गॅसिफायरचा वापर ः

  • वाळलेला तांदळाचा भुश्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते. तो गॅसिफिकेशन प्रक्रियेसाठी अधिक चांगला ठरतो.
  • भुसा गॅसिफायरच्या वरच्या छिद्रातून पूर्ण वरपर्यंत भरला जातो.
  • पूर्वज्वलनासाठी १५ मि.लि. रॉकेल वापरून ज्वलन केले जाते आणि हवा खेळती राहण्यासाठी खाली बसवलेला फॅन सौर ऊर्जेवर सुरू केला जातो.
  • आमरस उकळण्यासाठी एक तास लागतो. त्यानंतर आमरसाचा उत्कलन बिंदू हा ९५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचला की गॅसिफायर बंद करावा लागतो.
  • गॅसिफायर बंद झाल्यावर खाली असलेल्या राखेच्या डब्यातून राख बाहेर काढली जाते. त्यासाठी लिव्हर तंत्रज्ञानाचा वापरले केलेला आहे.
  • आमरसाचे योग्यप्रकारे पॅकेजिंग केल्यास ६ ते ९ महिन्यांपर्यंत साठवता येतो.
  • वैशिष्ट्ये ः

  • स्वच्छ आणि निसर्गपूरक इंधन वायू.
  • कमी खर्च आणि कमी देखभाल.
  • आदिवासी आणि भात लागवड क्षेत्रात वापर शक्य.
  • छोट्या जळावू कामांसाठी उपयुक्त.
  • निर्मिती खर्च ८००० रुपये.
  • नफा : खर्चाचे विश्लेषण ः

  • पारंपरिक पद्धतीमध्ये २० किलो आमरस आटवण्यासाठी २० किलो लाकडाचा उपयोग केला जातो.
  • एक किलो लाकडाचा खर्च सहा रुपये. वीस किलो लाकडाचा खर्च १२० रुपये होतो. त्याचबरोबरीने मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते.
  • तांदळाचा भुसा गॅसिफायरमध्ये इंधन म्हणून वापरल्यास खर्च कमी करणे शक्य होते.
  • वीस किलो आमरसासाठी ३.५ किलो भुसा इंधन म्हणून लागतो. एक किलो भुश्यासाठी प्रति किलो एक रुपये खर्च येतो. त्यामुळे वीस किलो आमरस आटवण्यासाठी ११६.५ रुपयांची बचत होते. त्याचबरोबरीने प्रदूषण कमी होऊन निसर्गाच्या संवर्धनासाठी मदत होते.
  • टीप ः इंधनासाठी लाकूड आणि भुश्याच्या दरामध्ये विभागानुसार बदल होऊ शकतो.
  • तंत्रज्ञान विकास ः गॅसिफायर तंत्रज्ञान विकासासाठी दापोली येथील कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी मनीष मानकर यास अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभागाचे प्रमुख डॉ. ए. जी. मोहोड, सहयोगी अधिष्ठाता डॉ. वाय. पी. खंडेतोड तसेच डॉ. के. जी. धांदे आणि अमित देवगिरीकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. या गॅसिफायरचे फॅब्रिकेशन विद्यापिठाच्या कार्यशाळेत करण्यात आले आहे. संपर्क ः डॉ. ए. जी. मोहोड ९४२२५४६९०५ मनीष मानकर ः ८६०५८२१९४९  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com