agriculture news in marathi, gacifier technology for mango juice | Agrowon

आंबा रस आटविण्यासाठी गॅसिफायर
डॉ. ए. जी. मोहोड, मनीष मानकर
मंगळवार, 17 एप्रिल 2018

कोकणात अजूनही आंबा आटवण्यासाठी चुलीमध्ये लाकडाचा वापर केला जातो. या लाकडाला पर्याय म्हणून तांदळाच्या भुश्याचा वापर गॅसिफायरच्या माध्यमातून करणे शक्य आहे.
 
गॅसिफिकेशन प्रक्रियेमध्ये प्राणवायू आणि हवेच्या संयोगाने इंधन म्हणून वापरलेल्या जैविक घटकाचे ज्वलन होऊन गॅसमध्ये रूपांतर होते. आमरस आटवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा चांगल्याप्रकारे उपयोग करता येतो. यामध्ये आपण इंधन म्हणून लाकूड, कचरा, पाला-पाचोळा, तांदळाचा भुस्सा याचा वापर करणे शक्य आहे. कोकणाचा विचार करता उपलब्ध तांदळाच्या भुशाचा वापर गॅसिफायरमध्ये इंधन म्हणून करणे शक्य आहे.

कोकणात अजूनही आंबा आटवण्यासाठी चुलीमध्ये लाकडाचा वापर केला जातो. या लाकडाला पर्याय म्हणून तांदळाच्या भुश्याचा वापर गॅसिफायरच्या माध्यमातून करणे शक्य आहे.
 
गॅसिफिकेशन प्रक्रियेमध्ये प्राणवायू आणि हवेच्या संयोगाने इंधन म्हणून वापरलेल्या जैविक घटकाचे ज्वलन होऊन गॅसमध्ये रूपांतर होते. आमरस आटवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा चांगल्याप्रकारे उपयोग करता येतो. यामध्ये आपण इंधन म्हणून लाकूड, कचरा, पाला-पाचोळा, तांदळाचा भुस्सा याचा वापर करणे शक्य आहे. कोकणाचा विचार करता उपलब्ध तांदळाच्या भुशाचा वापर गॅसिफायरमध्ये इंधन म्हणून करणे शक्य आहे.

गॅसिफायरची तांत्रिक रचना ः

 • व्यास ः २० सें. मी.
 • उंची ः १३५ सें. मी.
 • आमरस आटवण्यासाठी पातेल्याची क्षमता ः २० किलो
 • हवेचा दाब ः ३.५ मीटर घन/तास
 • फॅन साठी १० वॅट सौर प्लेट

गॅसिफायरचा वापर ः

 • वाळलेला तांदळाचा भुश्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते. तो गॅसिफिकेशन प्रक्रियेसाठी अधिक चांगला ठरतो.
 • भुसा गॅसिफायरच्या वरच्या छिद्रातून पूर्ण वरपर्यंत भरला जातो.
 • पूर्वज्वलनासाठी १५ मि.लि. रॉकेल वापरून ज्वलन केले जाते आणि हवा खेळती राहण्यासाठी खाली बसवलेला फॅन सौर ऊर्जेवर सुरू केला जातो.
 • आमरस उकळण्यासाठी एक तास लागतो. त्यानंतर आमरसाचा उत्कलन बिंदू हा ९५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचला की गॅसिफायर बंद करावा लागतो.
 • गॅसिफायर बंद झाल्यावर खाली असलेल्या राखेच्या डब्यातून राख बाहेर काढली जाते. त्यासाठी लिव्हर तंत्रज्ञानाचा वापरले केलेला आहे.
 • आमरसाचे योग्यप्रकारे पॅकेजिंग केल्यास ६ ते ९ महिन्यांपर्यंत साठवता येतो.

वैशिष्ट्ये ः

 • स्वच्छ आणि निसर्गपूरक इंधन वायू.
 • कमी खर्च आणि कमी देखभाल.
 • आदिवासी आणि भात लागवड क्षेत्रात वापर शक्य.
 • छोट्या जळावू कामांसाठी उपयुक्त.
 • निर्मिती खर्च ८००० रुपये.

नफा : खर्चाचे विश्लेषण ः

 • पारंपरिक पद्धतीमध्ये २० किलो आमरस आटवण्यासाठी २० किलो लाकडाचा उपयोग केला जातो.
 • एक किलो लाकडाचा खर्च सहा रुपये. वीस किलो लाकडाचा खर्च १२० रुपये होतो. त्याचबरोबरीने मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते.
 • तांदळाचा भुसा गॅसिफायरमध्ये इंधन म्हणून वापरल्यास खर्च कमी करणे शक्य होते.
 • वीस किलो आमरसासाठी ३.५ किलो भुसा इंधन म्हणून लागतो. एक किलो भुश्यासाठी प्रति किलो एक रुपये खर्च येतो. त्यामुळे वीस किलो आमरस आटवण्यासाठी ११६.५ रुपयांची बचत होते. त्याचबरोबरीने प्रदूषण कमी होऊन निसर्गाच्या संवर्धनासाठी मदत होते.
 • टीप ः इंधनासाठी लाकूड आणि भुश्याच्या दरामध्ये विभागानुसार बदल होऊ शकतो.

तंत्रज्ञान विकास ः
गॅसिफायर तंत्रज्ञान विकासासाठी दापोली येथील कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी मनीष मानकर यास अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभागाचे प्रमुख डॉ. ए. जी. मोहोड, सहयोगी अधिष्ठाता डॉ. वाय. पी. खंडेतोड तसेच डॉ. के. जी. धांदे आणि अमित देवगिरीकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. या गॅसिफायरचे फॅब्रिकेशन विद्यापिठाच्या कार्यशाळेत करण्यात आले आहे.

संपर्क ः डॉ. ए. जी. मोहोड ९४२२५४६९०५
मनीष मानकर ः ८६०५८२१९४९

 

इतर टेक्नोवन
खते देण्यासाठी ब्रिकेटस टोकण यंत्रसध्या विदर्भातील भात उत्पादक पट्ट्यामध्ये भाताची...
कंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...
वनस्पतीयुक्त भिंती सांगतील घराचे आरोग्यवनस्पतिशास्त्र आणि इमारत आरेखनशास्त्र या दोहोंचा...
ट्रॅक्टरचलित कुट्टी यंत्र, खड्डे खोदाई...मजूर टंचाई लक्षात घेता विविध यंत्रांची निर्मिती...
अंड्यापासून रेडी टू कूक उत्पादने अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये अंड्यापासून अर्ध...
सौर प्रकाश सापळा फायदेशीर...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अपारंपरिक...
पंचवीस एकरांत ‘ठिबक’मधील अत्याधुनिक...कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील प्रकाश...
सूत्रकृमींना रोखणारे विद्युत चुंबकीय...सूत्रकृमींचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या...
धान्य साठवणीतील कीड नियंत्रण सापळ्याचा...सध्या पावसाळी वातावरणामुळे ओलावा आणि तापमान कमी...
अवजारे कमी करतील महिलांचे श्रममध्यम ते मोठ्या आकाराच्या बियाण्याची टोकण...
ड्रोण करणार परागीकरणमोठ्या फळबागांमध्ये परागीकरण करण्यासाठी...
रोबो निवडतो तयार स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीचे फळ तसे नाजूक, त्याची तोडणी हलक्या...
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोडियम क्षारांचे अाधिक्य असलेल्या...जमिनीमध्ये सोडियम क्षारांचे प्रमाण वाढत असून,...
सातत्यपूर्ण ध्यासातून नावीन्यपूर्ण,...नाशिक जिल्हा द्राक्षशेतीसोबत अत्याधुनिक...
सूर्यफूल बियांपासून लोण्याची घरगुती...दुग्धजन्य लोण्याला तितकाच समर्थ पर्याय म्हणून...
अवजारांच्या वापरातून खर्च होईल कमीपीक उत्पादनाचा ३० ते ४० टक्के खर्च  शेती...
अल्पभूधारकांसाठी अधिक स्वस्त, कार्यक्षम...भारतामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडतील अशी...
सूर्यफूल बियांपासून प्रक्रियायुक्त...आपल्याकडे सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेलासाठी...
शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...