agriculture news in marathi, gaggery, betel nut inculded in crop mortgage scheme | Agrowon

शेतमाल तारण याेजनेत गूळ, सुपारी, घेवडाही
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 मे 2018

पुणे : घेवडा, सुपारी व गूळ उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल तारण याेजनेचा लाभ व्हावा, यासाठी या तीनही शेतमालाचा तारण याेजनेत समावेश करण्यात आला आहे. तर काजूच्या तारण कर्जासाठीचा दर प्रति किलाे ८० रुपयांवरुन १०० रुपये करण्यात आला आहे. अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

पुणे : घेवडा, सुपारी व गूळ उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल तारण याेजनेचा लाभ व्हावा, यासाठी या तीनही शेतमालाचा तारण याेजनेत समावेश करण्यात आला आहे. तर काजूच्या तारण कर्जासाठीचा दर प्रति किलाे ८० रुपयांवरुन १०० रुपये करण्यात आला आहे. अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

शेतमाल तारण याेजनेची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात पणन मंडळाच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांच्या सूचनेनुसार घेवडा, सुपारी व गुळाचा समावेश तारण याेजनेत समावेश करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली. तर काजूचा तारण याेजनेसाठीचा प्रतिकिलाेचा दर ८० रुपयांवरून १०० रुपये करण्यास ही मान्यता देण्यात आल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली. 

सुपारीला तारण कर्ज देताना बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के किंवा १०० रुपये प्रतिकिलाेने दर आकारण्यात यावेत. बाजार समित्यांनी स्वमालकीची गाेदामे नसल्यास आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी किंवा खासगी गाेदामे भाडेतत्त्वावर घेऊन याेजना राबवावी. तसेच या याेजनेतील शेतमालाचा विमा उतरविण्यात यावा. कर्जाची रक्कम बाजार समित्यांनी स्वनिधीतून अदा करावी. तर तारण कर्जाची प्रतिपूर्ती पणन मंडळाकडून करून देण्यात येणार असल्याचेही पणन मंडळाने स्पष्ट केले आहे.

गूळ तारण याेजनेसाठी बाजार समित्यांनी स्वमालकीची शितगृहे उभारण्याच्या सूचना पणन मंडळाने दिल्या आहेत. तर गूळ तारण ठेवताना बाजारभावाच्या ७० टक्के दराने आकारण्यात यावा. तसेच तारण ठेवण्यात येणाऱ्या गुळाच्या दर्जाच्या हमीबाबत प्रयाेगशाळेचे प्रमाणपत्र गरजेचे करण्यात आले आहे. तर गुळासाठीची याेजना अडीच महिन्यासाठी असणार असल्याचे पणन मंडळाने स्पष्ट केले असून, शेतमाल तारण याेजनेच्या सर्वसाधारण अटी गूळ, घेवडा व सुपारीसाठी लागू असणार आहेत.
 

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...
मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटीपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप...
पीकेव्ही २ बीटी वाणामुळे कापूस...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे...
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मिळणार...चिपळूण, जि. रत्नागिरी ः अलिबागच्या पांढऱ्या...
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...