agriculture news in marathi, galyukt shiwar scheme status, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यात तलाव, धरणांतून काढला सहा लाख घनमीटर गाळ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

सातारा  : शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचे काम जिल्ह्यात गतीने सुरू आहे. १३४ तलाव, धरणांतून सहा लाख १९ हजार घनमीटर गाळ आतापर्यंत काढण्यात आला आहे. त्यामुळे चांगला पाऊस झालेल्या गावांतील तलाव तुडुंब भरून गावे ‘जलयुक्‍त’ झाली आहेत. शिवाय दुष्काळी खटाव तालुक्‍यात या योजनेतून सर्वाधिक ३३ कामे झाली असून, त्यातून पावणेतीन लाख घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे.

सातारा  : शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचे काम जिल्ह्यात गतीने सुरू आहे. १३४ तलाव, धरणांतून सहा लाख १९ हजार घनमीटर गाळ आतापर्यंत काढण्यात आला आहे. त्यामुळे चांगला पाऊस झालेल्या गावांतील तलाव तुडुंब भरून गावे ‘जलयुक्‍त’ झाली आहेत. शिवाय दुष्काळी खटाव तालुक्‍यात या योजनेतून सर्वाधिक ३३ कामे झाली असून, त्यातून पावणेतीन लाख घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे.

राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली आहे. यामध्ये छोटी धरणे, तलावांतील गाळ काढून तो शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी दिला जातो. गाळ वाहतुकीचा खर्च हा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना करावा लागतो. इंधनासह इतर खर्च शासन व सीएसआर निधीतून देण्यात येतो. सातारा जिल्ह्यात इंधनासाठी २२ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. तलाव, धरणांमध्ये साचलेला गाळ काढून तो शेतात पसरविल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे.

"जलसंवर्धनातून समृद्धी''चा संकल्प असलेली ही योजना जिल्ह्यातील १२५ गावांमध्ये राबविली आहे. खटाव तालुक्‍यात ५० कामे मंजूर असून, त्यातील ३३ कामे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ माणमधील तलावांमधून एक लाख १५ हजार घनमीटर, कऱ्हाडमधील तलाव, धरणांमधून ६१ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.  

तालुकानिहाय पूर्ण कामे (कंसात गावांची संख्या)  :  खटाव ३३ (२१), कऱ्हाड २७ (१४), खंडाळा ४ (१२), कोरेगाव १८ (१४), माण १९ (२१), पाटण ९ (१५), फलटण १२ (१२), सातारा १० (९), वाई २ (७).

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...