agriculture news in marathi, Gandool Khad Project in Pandharpur along with Solapur, Sangola Market Committee | Agrowon

सोलापूरसह पंढरपूर, सांगोला बाजार समितीत गांडूळ खत प्रकल्प
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, त्यांना दर्जेदार व गुणवत्तेचा शेतमाल उत्पादन करता यावा, यासाठी शेतजमिनीची सुपीकता वाढण्यावर भर देण्यात येत आहे. अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानासोबत जैविक खताचा वापर होणे गरजेचे आहे, या अनुषंगाने पणन विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला असून, भविष्यात देखील शेतकरी बांधवांच्या सक्षमतेसाठी पाठबळ दिले जाईल.
- सुभाष देशमुख, मंत्री, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

सोलापूर  : महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये जैविक घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खत प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांना ७५ लाखाचा निधी त्यासाठी पणन विभागाकडून मंजूर करण्यात आला असून, या प्रकल्प उभारणीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.  

सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी यासाठी पुढाकार घेत या तीनही बाजार समितीला हा निधी देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार आता सोलापूर, पंढरपूर व सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे. या कृषी बाजार समित्यांना प्रकल्पाकडून प्रत्येकी २५ लाखांचे साहित्य स्वरुपात अनुदान देण्यात आलेले आहे. या प्रकल्पातून बाजार समिती आवारातील प्रतिदिन ३ ते ४ मेट्रिक टन जैविक घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येवून शेतकऱ्यांना अत्यंत अल्प किंमतीत दर्जेदार गांडूळखत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी जैविक खत वापरून शेतीचा पोत सुधारावा आणि रासायनिक अन्नघटक वाढीस आळा बसावा, सुधारित शेतीमध्ये देखील जैविक घटकाचा अवलंब व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहेत.

इतर बातम्या
पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढलीपुणे : पावसाळा संपताच उन्हाचा चटका वाढल्याने पुणे...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
निर्यात वाढविण्यासाठी कृषी विभाग...परभणी ः शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
बांगलादेशातील रेशीम उद्योग...प्राचीन काळी भारतीय उपखंडामधील रेशमी कापड हे जगभर...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
म्हैसाळ उपसाचे मागणीअभावी काही पंप बंदसांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन आठवडाभरापूर्वी पंप...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
कमी पाऊस झाल्याने मनरेगा’च्या मजुर...नगर : पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया...