‘गंगापूर’च्या पाणीपातळीत चार टक्क्यांनी वाढ

‘गंगापूर’च्या पाणीपातळीत चार टक्क्यांनी वाढ
‘गंगापूर’च्या पाणीपातळीत चार टक्क्यांनी वाढ

नाशिक  : सातत्याने खालावत चाललेल्या नाशिक जिल्ह्यातील काही धरणांमधील पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गंगापूर धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. याखेरिज जिल्ह्यातील आठ धरणांच्या पातळीत वाढ होण्यास या पावसामुळे मदत झाली आहे.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने जिल्ह्यात जोरदार कमबॅक केले. पावसाने रविवारी (ता. २४) रात्री आणि सोमवारी (ता.२५) दिवसभर जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील ९२ पैकी अनेक मंडळांमध्ये पावसाने जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे नद्यांसह धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

 या पावसामुळे गंगापूर धरणामध्ये रविवारी २४ टक्के पाणीसाठा होता. तो आता २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. याच धरणसमूहातील आळंदी धरणातील साठाही ११ वरून १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूर धरणसमूहातील पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली असून, तो १९ वरून २१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

पालखेड धरणसमूहातील पुणेगाव आणि वालदेवी या धरणांमधील पाणीसाठा प्रत्येकी एक टक्क्याने, तर नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाणीसाठा तीन टक्क्यांनी वाढला आहे. भावली धरणातील पाणीसाठाही शून्यावरून १० टक्क्यांवर गेला आहे. गिरणा खोऱ्यातील हरणबारी आणि पुनद या दोन धरणांमधील पातळीतही दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पालखेड धरणसमूहामधील पाणीसाठा एक टक्क्याने, तर गिरणा धरणसमूहामधील पाणीसाठा दोन टक्क्यांनी वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये दोन दिवसांपूर्वी ७,११८ दशलक्ष घनफूट पाणी होते. मात्र, तो ४०१  दशलक्ष घनफुटांनी वाढून ७, ५१९ दशलक्ष घनफुटांवर पोहोचला आहे.

धरण पाणीसाठा (पूर्वी)   पाणीसाठा (२८ जून)
गंगापूर  १४१२ दलघफू  १६०६ दलघफू
आळंदी    १०५ दलघफू    १४५ दलघफू
पुणेगाव      ३०९ दलघफू ३२९ दलघफू
भावली    ० दलघफू  १४५ दलघफू
वालदेवी  ० दलघफू १४ दलघफू
नांदूरमध्यमेश्वर    २४३ दलघफू  २५३ दलघफू
हरणबारी    ५१ दलघफू  ७२ दलघफू
पुनद  ४०१ दलघफू  ४२६ दलघफू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com