agriculture news in Marathi, garlic rates for per quintal at 1310 to 4000 rupes, Maharashtra | Agrowon

राज्यात लसूण प्रतिक्विंटल १३१० ते ४००० रुपये
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

जळगावात प्रतिक्विंटल २००० ते ४२०० रुपये
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाची आवक वाढली असून, २००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर आहे.

बाजार समितीमध्ये केवळ दर शुक्रवारी लसणाचे लिलाव होतात. बाजार समितीमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात येथून लसणाची आवक होते. तसेच काही प्रमाणात सिन्नर (जि. नाशिक) येथूनही आवक होत असते. परंतु यंदा सिन्नर येथून होणारी आवक हवी तशी नाही. आवक कमी अधिक होत आहे. परंतु दर मात्र स्थिर आहेत. 

बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)  

जळगावात प्रतिक्विंटल २००० ते ४२०० रुपये
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाची आवक वाढली असून, २००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर आहे.

बाजार समितीमध्ये केवळ दर शुक्रवारी लसणाचे लिलाव होतात. बाजार समितीमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात येथून लसणाची आवक होते. तसेच काही प्रमाणात सिन्नर (जि. नाशिक) येथूनही आवक होत असते. परंतु यंदा सिन्नर येथून होणारी आवक हवी तशी नाही. आवक कमी अधिक होत आहे. परंतु दर मात्र स्थिर आहेत. 

बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)  

तारीख आवक किमान कमाल सरासरी
१३ ऑक्‍टोबर  ६५ २००० ४२०० २५००
६ ऑक्‍टोबर ५५ २००० ४२०० ३२००
२९ सप्टेंबर  ४० २००० ४००० २८००
२२ सप्टेंबर ७२ २००० ४५०० ३०००

औरंगाबादेत प्रतिक्विंटल २००० ते ७००० रुपये
औरंगाबाद  : औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारणपणे रविवार व गुरुवार या दोनच दिवशी लसणाची आवक होते. रविवारी (ता. १५) बाजार समितीमध्ये लसणाची आवक ९५ क्‍विंटल झाली या लसणाला २००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणारा लसूण सर्वांत जास्त प्रमाणात इंदूरवरून येतो. सोबतच औरंगाबाद, फुलंब्री, गंगापूर आदी तालुक्‍यांमधील काही गावांमधूनही लसूण विक्रीसाठी येतो. १२ ऑक्‍टोबरला १०७ क्‍विंटल आवक होऊन २००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ८ ऑक्‍टोबरला १३५ क्‍विंटल आवक, तर दर २००० ते ६५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७ ऑक्‍टोबरला आवक ११० क्‍विंटल, तर दर २००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५ ऑक्‍टोबरला १२० क्‍विंटल आवक होऊन २००० ते ७५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नाशिकला प्रतिक्विंटल १३१० ते ४००० रुपये
नाशिक : येथील बाजार समितीत बुधवारी (ता. १८) लसणाची २७ क्विंटल आवक झाली. या वेळी लसणाला प्रति क्विंटलला १३१० ते ४००० व सरासरी ३००० रुपये दर मिळाला.

मागील महिन्यापासून लसणाची आवक व दर स्थिर आहेत. नाशिकच्या निफाड व दिंडोरी तालुक्‍याच्या काही भागांतून लसणाची आवक होते. इतर शेतीमालाच्या तुलनेत लसणाची 
आवक सातत्याने कमी असते. त्यामुळे दर स्थिर असतात. येत्या काळातही लसणाचे सध्याचे दर स्थिर राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

साताऱ्यात प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये
सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी व गुरुवारी लसणाची आवक होते. बाजार समितीत गुरुवारी (ता. १५) लसणाची १६ क्विंटल आवक झाली, लसणास क्विंटलला २५०० ते ३५०० असा दर मिळाला. ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरवातीपासून लसणाचे २५०० ते ३५०० या दरम्यान दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत बहुतांशी लसूण इतर जिल्ह्यांत आवक होत आहे. आठ ऑक्‍टोबरला लसणाची ६० क्विंटल आवक झाली असून, लसणास क्विंटलला २५०० ते ३५०० असा दर मिळाला आहे. २४ सप्टेंबरला लसणाची ३२ क्विंटल आवक झाली असून, लसणास क्विंटलला २००० ते २५०० असा दर मिळाला आहे. लसणाची ४० ते ५० रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री केली जात आहे.

नागपुरात प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये
नागपूर ः गेल्या महिनाभरापासून आवक कमी असली तरी लसणाचे दर फारसे वधारल्याचे चित्र नाही. किरकोळ बाजारात लसूण ४० ते ५० रुपये किलो दराने विकल्या जात असून, घाऊक बाजारात २५०० ते ४००० रुपये प्रति क्‍विंटलचे दर आहेत.

नागपुरात सप्टेंबर महिन्यापासून लसणाची आवक २५० ते ३०० क्‍विंटलच्या घरात आहे. आवक कमी असली तरी दरातही तेजी नाही. सप्टेंबरच्या सुरवातीला ३००० ते ४५०० रुपये प्रति क्‍विंटल दर होते. १३ सप्टेंबरला हेच दर २००० ते ४००० रुपये प्रति क्‍विंटलवर पोचले. २८ सप्टेंबर रोजीचे दर ३००० ते ४५०० रुपये क्‍विंटलचे होते. २४ सप्टेंबर रोजी बाजारात पोचलेला जुना लसूण २५०० ते ४००० रुपये प्रति क्‍विंटलने विकल्या गेला. ऑक्‍टोबरच्या सुरवातीला लसणाची आवक ८४४ क्‍विंटलवर पोचली. या वेळी दरात पुन्हा काही अंशी तेजी येत ३००० ते ४५०० रुपये क्‍विंटल झाले. सद्यःस्थितीत आवकमध्ये चढउतार होत असून, ३०० ते ७०० क्‍विंटलपर्यंत आवक जात आहे. लसणाचे दर आताच्या घडीला २५०० ते ४००० रुपये प्रति क्‍विंटलचे आहेत.

परभणीत प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये
परभणी (प्रतिनिधी)ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १९) लसणाचे दर २२०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये आठवड्यातील प्रत्येक शनिवारी मध्य प्रदेशातील इंदूरहून लसणाची आवक येत असते. शनिवारी (ता. १४) लसणाची ३०० क्विंटल आवक झाली होती. त्यास २२०० ते ३०००  रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. 
शनिवारच्याच दराने आठवडाभर विक्री होत असते. गत महिनाभरात ३०० ते ४०० क्विंटल लसणाची आवक झाली. त्यास सरासरी १५०० ते  ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. 
गुरुवारी (ता. १९) घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल होते, तर किरकोळ विक्री ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी अब्दुल सलाम यांनी सांगितले.

बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये) 

तारीख आवक किमान कमाल
२३ सप्टेंबर   ३०० १८०० २०००
३० सप्टेंबर   ४०० १५०० २२००
७ आॅक्टोबर  ४०० २००० ३०००
१४ आॅक्टोबर  ३५० २२०० ३०००

सांगलीत प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये 
सांगली ः येथील विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये लसणाची आवक कमी अधिक प्रमाणात होत आहे. मंगळवारी (ता. १७) लसणाची १३१ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंल २००० ते ५००० तर सरासरी ३००० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

येथील बाजार समितीच्या आवारात गुजरात राज्यातून आवक होते. सध्या लसणाला मागणी कमी आहे. यामुळे बाजार समितीत तीन दिवसांतून लसणाची आवक होते. शनिवारी (ता. १४) लसणाची आवक १२५ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ४२०० रुपये तर सरासरी ३००० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. १०) लसणाची आवक १७० क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये, तर सरासरी ३००० रुपये असा दर मिळाला. पुढील सप्ताहात लसणाची आवक आणि दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.
            
पुण्यात प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये
पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १९) मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे ४ हजार गाेणी आवक झाली हाेती. या वेळी त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये दर हाेता. बाजारात लसणाची आवक प्रामुख्याने मध्य प्रदेशातूनच हाेत आहे. सध्या हाेणारी आवक ही सरासरी असून, दर पण स्थिर असल्याचे ज्येष्ठ अडते राजेंद्र काेरपे यांनी सांगितले.

बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

तारीख आवक किमान कमाल
१८ आॅक्टोबर २५८ १८०० ४५००
१७ आॅक्टोबर ८६९ १८०० ४५००
१६ आॅक्टोबर ८८९ १८०० ४५००
१५ आॅक्टोबर १४९३ १८०० ४५००

            

 

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...