मुंबईत लसूण प्रतिक्विंटल २६०० ते ४८०० रुपये

लसूण
लसूण

मुंबई: राज्यभर वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली आहे. बाजार समितीतील शेतमालाची मंगळवारी (ता. १४ ) मार्केटमध्ये ५५० ट्रक भाजीपाला आवक झाली. सोमवारी (ता.१३) लसणाची ३३६० क्विंटल आवक झाली होती. त्यास २६०० ते ४८०० व सरासरी ३७०० रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले. कांद्याची १९२० क्विंटल आवक होऊन त्यास २००० ते ३५०० व सरासरी २७५० रुपये प्रतिक्विंटल दर होते. बटाट्याची १४८०० क्विंटल आवक होऊन ६०० ते १२०० व सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटल दर होते. लिंबाची ५२७ क्विंटल आवक होऊन १०० ते १५० रुपये प्रतिशेकडा भाव मिळाला. भुईमूग शेंगेची २८ क्विंटल आवक होऊन ५०००ते ५५०० व सरासरी ५२५० रुपये दर मिळाला. आल्याची १२५० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल २२०० ते २४०० व सरासरी २२०० रुपये दर मिळाले. भेंडीची ५५१ क्विंटल आवक झाली होती, तीस ३००० ते ३५०० व सरासरी ३२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले होते. फ्लॉवरची ४३८० क्विंटल आवक झाली होती, या वेळी त्यास १४०० ते १८०० व सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. गवारची ८५ क्विंटल आवक झाली होती, या वेळी गवारीस ३००० ते ४०००  व सरासरी ३७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. शेवगा शेंगेची १४० क्विंटल आवक झाली होती. त्यास ४००० ते ५००० ते सरासरी ४५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर  (प्रतिक्विंटल/रुपये)

शेतमाल     आवक     किमान     कमाल      सरासरी
टोमॅटो नं१  ४८५     ३०००     ३८००     ३४००
वांगी     ३५९     ३५००     ४०००     ३७५०
हिरवी मिरची   ३०८७     २६००     ३०००     २८००
वाटाणा     ६५८     ६०००     ८०००     ७०००
डाळिंब     ४८५     ७३००     ७५००     ७४००
मोसंबी     १०५०     ११००     २१००     १६००
पपई     २४०     १८०० ३२००     २५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com