agriculture news in Marathi, Gaur and mattur rates up in kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात गवार, ओला वाटाणा तेजीत
राजकुमार चौगुले
मंगळवार, 6 मार्च 2018

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार, ओला वाटाण्याच्या दरात तेजी राहिली. गवारीची दररोज पंचावन्न ते साठ पोती आवक झाली. गवारीस दहा किलोस २५० ते ४०० रुपये दर मिळाला. ओला वटाण्यास दहा किलोस २०० ते ३३० रुपये दर होता. 
हिरव्या मिरचीची दररोज चारशे ते पाचशे पोती आवक होती.

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार, ओला वाटाण्याच्या दरात तेजी राहिली. गवारीची दररोज पंचावन्न ते साठ पोती आवक झाली. गवारीस दहा किलोस २५० ते ४०० रुपये दर मिळाला. ओला वटाण्यास दहा किलोस २०० ते ३३० रुपये दर होता. 
हिरव्या मिरचीची दररोज चारशे ते पाचशे पोती आवक होती.

हिरव्या मिरचीस दहा किलोस ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. वरण्याच्या दररोज ऐंशी ते शंभर पोती आवक होती. वरण्यास दहा किलोस १५० ते ३३० रुपये दर होता. दोडक्‍याची दोनशे ते तीनशे करंड्या आवक झाली. दोडक्‍यास दहा किलोस १०० ते ४०० रुपये दर मिळाला. गाजराची दररोज दोनशे ते तीनशे पोती आवक होती. गाजरास दहा किलोस ५० ते २०० रुपये दर मिळाला.

 पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दहा ते बारा हजार जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ७०० रुपये दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कोथिंबिरीच्या दरात काहीशी सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. मेथीची दररोज पंधरा ते सोळा हजार जुड्या आवक झाली. मेथीस शेकडा २०० ते ४०० रुपये दर होता. मेथीचे दर गेल्या सप्ताहाच्या तुलनेत स्थिर होते.

द्राक्षाची दररोज तीनशे ते चारशे बॉक्‍स आवक होती. द्राक्षास किलोस २० ते ३५ रुपये दर मिळाला. लिंबूची दररोज दीडशे ते दोनशे चुमड्यांची आवक झाली. एक हजार लिंबांच्या पोत्यास ३५० ते १०५० रुपये इतका दर होता. 

गुळाचे दर वधारतील
सप्ताहात गुळाची दररोज पंधरा हजार रव्यांची आवक होती. गुळास क्विंटलला २९०० ते ४३०० रुपये दर मिळत असल्याची माहिती गूळ विभागाच्या सूत्रांनी दिली. येत्या पंधरा दिवसांत गुळाची आवक थोड्या-थोड्या प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळे येत्या पंधरवड्यात गुळाचे दर काहीसे वधारतील, अशी शक्‍यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...