agriculture news in Marathi, gaur, ladies finger and cucumber ups in solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात गवार, भेंडी, काकडीला उठाव
सुदर्शन सुतार
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, काकडीची आवक तुलनेने कमीच राहिली; पण मागणी चांगली असल्याने त्यांच्या दरात संपूर्ण सप्ताहात तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, काकडीची आवक तुलनेने कमीच राहिली; पण मागणी चांगली असल्याने त्यांच्या दरात संपूर्ण सप्ताहात तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारीची १० ते १५ क्विंटल, भेंडीची १० ते २० क्विंटल आणि काकडीची १५ ते २० क्विंटलपर्यंत आवक राहिली, ही सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे; पण किंचित चढ-उतार वगळता दर मात्र टिकून आहेत. गवारीला प्रतिदहा किलोसाठी २७० ते ५०० व सरासरी ३०० रुपये, भेंडीला ६० ते ३५० व सरासरी २०० रुपये, तर काकडीला ८० ते २५० व सरासरी १८० रुपये असा दर होता. त्याशिवाय वांगी, टोमॅटो यांचे दरही काहीसे स्थिर राहिले.

त्यांची आवक मात्र जास्त होती. वांग्याची रोज ३० ते ४० क्विंटल आणि टोमॅटोची रोज किमान ३०० क्विंटलपर्यंत आवक झाली. वांग्याला प्रतिदहा किलोसाठी ८० ते ३०० व सरासरी २२० रुपये, तर टोमॅटोला ५० ते ३५० व सरासरी २०० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्यामध्ये कोथिंबीर, मेथीचे दर वधारले. त्यातही कोथिंबिरीला चांगला उठाव होता. भाज्यांची आवक तशी जेमतेमच रोज ५ ते ८ हजार पेंढ्यांपर्यंत होती. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी १००० ते १९०० रुपये आणि मेथीला ६०० ते १४०० रुपये असा दर मिळाला. 

कांद्याचे दर वधारले
कांद्याच्या दरात या सप्ताहात चांगलीच सुधारणा झाली. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर हलत नव्हते; पण या सप्ताहात आवकही काहीशी वाढली; पण मागणी चांगली असल्याने दरही वाढले. कांद्याची आवक रोज ६० ते ८० गाड्यांपर्यंत होती. कांद्याची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. कांद्याला प्रतिक्विंटल ३०० ते ३८०० व सरासरी १५०० रुपये असा दर राहिला.

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...