agriculture news in marathi, Gauva per qunital 800 to 7000 rupees in maharashtra | Agrowon

राज्यात पेरू प्रतिक्विंटल ८०० ते ७००० रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये
नागपूर  : बाजारात वाढती आवक आणि सोबतच मागणी असल्याने पेरूला किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलोचा दर मिळत आहे. महात्मा फुले बाजारात पेरूची आवक १०० ते १५० क्विंटलच्या घरात आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा, नागपूर परिसरांतून पेरूची आवक स्थानिक बाजारात होत आहे. पेरूला मागणी वाढती असून, किरकोळ दर ६० ते ७० रुपये किलोवर आहेत. घाऊक दरात चढ-उतार होत असल्याचे व्यापारी सांगतात. नजीकच्या काळात पेरूची आवक वाढेल, असाही अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला अाहे.

नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये
नागपूर  : बाजारात वाढती आवक आणि सोबतच मागणी असल्याने पेरूला किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलोचा दर मिळत आहे. महात्मा फुले बाजारात पेरूची आवक १०० ते १५० क्विंटलच्या घरात आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा, नागपूर परिसरांतून पेरूची आवक स्थानिक बाजारात होत आहे. पेरूला मागणी वाढती असून, किरकोळ दर ६० ते ७० रुपये किलोवर आहेत. घाऊक दरात चढ-उतार होत असल्याचे व्यापारी सांगतात. नजीकच्या काळात पेरूची आवक वाढेल, असाही अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला अाहे.

औरंगाबादेत प्रतिक्विंटल ८०० ते २००० रुपये
औरंगाबाद :
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २३) पेरूची २२ क्‍विंटल आवक झाली. या पेरूला ८०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. आवक वाढल्याने पेरूचे कमाल दर कमी झाले अाहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये गत पंधरवड्यात पेरूची आवक स्थिर नाही. त्यामुळे सरासरी दरही १२०० ते १८०० दरम्यान राहिले. ९ नोव्हेंबरला १० क्‍विंटल आवक झालेल्या पेरूला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११ नोव्हेंबरला ८ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूचा दर १५०० ते २६०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिला. १२ नोव्हेंबरला १७ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १३ नोव्हेंबरला १३ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूचा दर १५०० ते १८०० रुपये राहिला. १४ नोव्हेंबरला पेरूची आवक २४ क्‍विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये राहिला. १५ नोव्हेंबरला १३ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूला १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १८ नोव्हेंबरला १८ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूचे दर १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १९ नोव्हेंबरला ९ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूचा दर १००० ते १८०० रुपये राहिला. २१ नोव्हेंबरला १२ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूचा दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २२ नोव्हेंबरला ३३ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूला ८०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

अावक, दर (प्रतिक्विंटल/रुपये)

तारीख अावक दर
११ नोव्हेंबर १५००-२६००
१२ नोव्हेंबर १७ १५००-२०००
१३ नोव्हेंबर १३ १५००-१८००
१४ नोव्हेंबर २४ १०००-१५००
१५ नोव्हेंबर १३ १०००-२०००
१८ नोव्हेंबर १८ १६००-२०००
१९ नोव्हेंबर -- १०००-१८००
२१ नोव्हेंबर १२ १०००-१४००
२२ नोव्हेंबर ३३ ८००-२०००

पुण्यात प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये
पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २३) पेरूची सुमारे १ हजार क्रेट आवक झाली हाेती. या वेळी २० किलाेच्या क्रेटला ३०० ते ५०० रुपये दर हाेता. सध्या पेरूचा हंमाम जाेमात असून, आवक चांगली आहे. त्या तुलनेत दर सरासरी अाहेत, असे व्यापारी सुनील बाेरसे यांनी सांगितले. पुणे बाजार समितीमध्ये पेरूची प्रामुख्याने आवक ही शिर्डी, राहाता, नगर, बारामती या भागांतून हाेत आहे. आवकेमध्ये लखनाै ४९ वाणाचे प्रमाण जास्त आहे. तर सासवड भागातून लाल पेरूची आवक हाेत आहे. पेरूचा हंगाम हा जून ते जानेवारीदरम्यान असताे. सध्या हंगाम जाेमात आहे. स्थानिक पेरूबराेबर रायपूर शून्य वाणाच्या पेरूचीदेखील आवक हाेत अाहे. या पेरूचा आकार सरासरी आकारापेक्षा माेठा असल्याने लक्ष वेधून घेणारा आहे. या पेरूची दरराेज सुमारे ५० क्रेटची आवक हाेत अाहे. या पेरूचा दर प्रतिकिलाे ४० ते ७० रुपये एवढा अाहे, असे श्री. बाेरसे यांनी सांगितले.

गेल्या चार दिवसांत झालेली आवक (किलाे) आणि दर (प्रतिकिलाे)

दिनांक   आवक   दर (रुपये) 
२२   २१,२०१   २५-५०   
२१   १५,६०८   २५-७० 
२०   ६, ७१४   २५-५० 
१९  २५,००१ २०-५०

 
जळगावात प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये
जळगाव :
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पेरूची अत्यल्प आवक होत अाहे. गुरुवारी (ता. २३) पेरूला किलोमागे १० रुपये दर मिळाला. आवक एकच क्विंटल झाली. जिल्ह्यात पेरूची लागवड एरंडोल व पाचोरा तालुक्‍यांत केली जाते. तसेच जळगाव तालुक्‍यातील विदगाव, रिधूर भागांसह यावलमधील डांभुर्णी व परिसरातही काही प्रमाणात पेरूच्या बागा आहेत. याच भागातून किरकोळ आवक बाजार समितीमध्ये होते. महिनाभरापासून पेरूची आवक सुरू झाली. त्याचे सुरवातीपासून दर स्थिर असून, अनेक शेतकरी बाजार समितीमध्ये पेरू न आणता त्यांची हातविक्री करतात. जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक, महसूल अधिकारी निवासस्थाने परिसर, घाणेकर चौक भागात शेतकरी थेट विक्री करतात. रोज १० ते १२ विक्रेते काव्यरत्नावली चौक परिसरात असतात. किरकोळ विक्रीत प्रतिकिलो २५ ते ३० रुपये दर मिळत असल्याने बाजार समितीमध्ये शेतकरी पेरू विक्रीसाठी फारसा आणत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. महिनाभरात बाजार समितीत प्रतिदिन सरासरी सुमारे एक क्विंटल एवढीच आवक राहिली. त्याला प्रतिक्विंटल एक हजार ते १२०० रुपये दर मिळाला, असे सूत्रांनी सांगितले. 

अकोल्यात प्रतिक्विंटल १२०० ते २५०० रुपये
अकोला : हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारात दाखल होणारे पेरू अकोला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत अाहेत. चांगल्या दर्जाचा पेरू २५०० रुपये प्रतिक्विंटलने विकत अाहे. कमीत कमी १२०० रुपयांपासून पेरूला भाव मिळत अाहे.
सध्या अकोला बाजारपेठेत जिल्ह्यासह बुलडाणा भागातून पेरूची मोठ्या प्रमाणात अावक होत अाहे. चांगल्या प्रतीच्या पेरूला ठोक बाजारात २५०० रुपयांपर्यंत दर मिळत अाहे. दुय्यम प्रतीचा पेरू १२०० ते १६०० पर्यंत सरासरी विकला जात अाहे. अकोल्यात दररोज किमान २० क्विंटलपेक्षा अधिक अावक अाहे. बोरांची अावक सुरू झाल्याने पेरूच्या दरांवर थोडाफार परिणाम झाला. ३० ते ३५ रुपयांपर्यंत विकले जाणारे पेरू २५ रुपयांपर्यंत घसरले अाहेत. किरकोळ बाजारात पेरू ४० रुपये किलोने ग्राहकांना मिळत अाहे. अावक स्थिर झाली असून, दरांमध्ये सध्या तरी घसरण किंवा वाढ होईल, असे वाटत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

परभणीत प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये
परभणी : 
कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २३) पेरूची ४० क्विंटल आवक झाली होती. पेरूला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये पंधरवाड्यापासून स्थानिक परिसरातून पेरूची आवक होत आहे. मागच्या गुरुवारी (ता. १६) पेरूची २० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले होते. या आठवड्यात आवक वाढली असून, दररोज ३४ ते ४० क्विंटल आवक होत आहे. गुरुवारी (ता. २३) ४० क्विंटल पेरूची आवक झाली होती. घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये होते, तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी अब्दुल माजीद यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...