agriculture news in Marathi, gave goggle and mask with pesticide bottle, Maharashtra | Agrowon

कीडनाशकाच्या बाटलीसोबत आता गॉगल आणि मास्क
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

गेल्या वर्षी फवारणीदरम्यान विषबाधेचे प्रकार घडले होते. या घटनांमध्ये बाधितांपैकी काही जणांचा मृत्यूही झाला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याकरिता या वर्षीच्या हंगामात कीडनाशक विक्रेत्यांना गॉगल आणि मास्क देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- विजय कुमार, मुख्य सचिव (कृषी)

नागपूर ः राज्यात या पुढे कोणतेही कीडनाशक विक्री करताना त्यासोबत मास्क आणि गॉगल देणे विक्रेत्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात यापूर्वी फवारणीदरम्यान घडलेल्या विषबाधांवर नियंत्रणासाठी हा पर्याय अवलंबिण्यात आल्याची माहिती कृषी खात्याच्या विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

गेल्या वर्षीच्या हंगामात बोंडअळीच्या नियंत्रणाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होण्याचे प्रकार घडले होते. याची सर्वाधिक झळ यवतमाळ जिल्ह्यात बसली. तब्बल १९ जणांना या घटनेत आपला जीव गमवावा लागला. या सर्वांना सुरवातीला दोन लाख व त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर अतिरिक्‍त दोन लाख याप्रमाणे चार लाख रुपयांची मदत देण्यात आली. राज्यात फवारणी दरम्यान, झालेल्या विषबाधेमुळे दगावणाऱ्यांची संख्या ४८ वर पोचली होती. त्याची दखल घेत या वर्षी फवारणीदरम्यान होणाऱ्या विषबाधांच्या घटनांवर नियंत्रणाचे प्रयत्न कृषी विभागाकडून केले जात आहेत. 

त्याच प्रयत्नाअंतर्गंत या वर्षी किडनाशकासोबत मास्क आणि गॉगल देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. कीटकनाशक विक्रेत्यांना कीडनाशकाची खरेदी करणाऱ्यांना हे सुरक्षाविषयक साहित्य द्यावे लागेल, तसे आदेश देण्यात आले आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...