agriculture news in Marathi, gave priority for Cleanliness, Maharashtra | Agrowon

कार्तिक वारीत स्वच्छतेला प्राधान्य द्या : जिल्हाधिकारी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

सोलापूर: आषाढीवारी प्रमाणे कार्तिकवारीत पंढरपुरात स्वच्छता महत्वाची असल्याने सर्व यंत्रणांनी स्वच्छतेला प्राधान्य देवून त्याप्रमाणे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी (ता. २३) येथे दिल्या.

येत्या ३१ ऑक्‍टोबर २०१७ रोजी पंढरपुरात कार्तिक वारीचा सोहळा संपन्न होणार असून या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कार्तिक वारी नियोजनासंदर्भात सर्व संबंधित विभागाची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

सोलापूर: आषाढीवारी प्रमाणे कार्तिकवारीत पंढरपुरात स्वच्छता महत्वाची असल्याने सर्व यंत्रणांनी स्वच्छतेला प्राधान्य देवून त्याप्रमाणे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी (ता. २३) येथे दिल्या.

येत्या ३१ ऑक्‍टोबर २०१७ रोजी पंढरपुरात कार्तिक वारीचा सोहळा संपन्न होणार असून या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कार्तिक वारी नियोजनासंदर्भात सर्व संबंधित विभागाची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, कार्तिकवारीत पंढरपुरात वारकरी-भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. येणाऱ्या वारकरी-भाविकांना समाधान वाटावे अशा प्रकारे स्वच्छतेचे नियोजन करावे. यामध्ये स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालयांचाही सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

``वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था, आरोग्य सेवा, पुरेसा औषधसाठा या बाबी महत्त्वाच्या असून संबंधित यंत्रणांनी यासाठी दक्ष राहावे. महावितरणने या कालावधीत शहरात व ६५ एकर येथे अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील, याबाबत दक्षता घ्यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने फेरीवाले, हॉटेल यांच्याकडील अन्नपदार्थांची तपासणी करावी. नगर परिषदेने धोकादायक इमारतींमध्ये वारकरी-भाविक वास्तव्यास राहणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी. गर्दीच्या मार्गावरील सर्व अतिक्रमणे हटविण्याबाबतही नगरपालिकेने कारवाई सुरू करावी. मंदिर समितीने दर्शनमंडप, स्काय वॉक, पत्राशेड, दर्शन रांगेत वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा याबाबत नियोजन करावे. महाराष्ट्र एसटी महामंडळाने आवश्‍यक असणाऱ्या जादा एसटी बसचे नियोजन करावे. वारीकालावधीत अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात,`` अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठकीत दिल्या.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...