agriculture news in Marathi, gawar at 400 to 500 rupees in satara, Maharashtra | Agrowon

साताऱ्यात गवारीस दहा किलोस ४०० ते ५०० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जानेवारी 2018

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.९) गवार, दोडका, वाटाणा, कोथिंबीर तेजीत आहेत. गवारीची दोन क्विंटल आवक झाली असून, दहा किलो गवारीस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. गवारीस रविवारच्या तुलनेत (ता.७) दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.९) गवार, दोडका, वाटाणा, कोथिंबीर तेजीत आहेत. गवारीची दोन क्विंटल आवक झाली असून, दहा किलो गवारीस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. गवारीस रविवारच्या तुलनेत (ता.७) दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

दोडक्‍याची सहा क्विंटल आवक झाली असून, दहा किलो दोडक्‍यास ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. दोडक्‍यास दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. वाटाण्याची २६ क्विंटल आवक होऊन दहा किलोस २८० ते ३२० रुपये दर मिळाला. काळा घेवड्याची १२ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. शेवग्याची सात क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला.

वाल घेवड्याची २५ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. पावट्याची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते ४५० रुपये दर मिळाला. भेंडीची १२ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. हिरवी मिरचीची १७ क्विंटल आवक, तर दहा किलोस २०० ते २५० रुपये दर मिळाला. वांग्याची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलोस १५० ते २०० रुपये दर मिळाला.

टोमॅटोची ५६ क्विंटल आवक तर दहा किलोस ६० ते ८० रुपये दर मिळाला. पालेभाज्यात कोथिंबीर तेजीत आहे. कोथिंबीरीची ३२०० जुड्याची आवक होऊन शेकड्यास २०० ते ३०० रुपये दर मिळाला. मेथीची ३००० जुड्याची आवक होऊन शेकड्यास ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. डाळिंबाची ३० क्रेटची आवक होऊन प्रतिक्रेटला ३०० ते ७०० रुपये दर मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
पुणे बाजार समितीत पालेभाज्यांच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीमध्ये...
एप्रिल-मेमध्ये बाजार फायदेशीर राहण्याचे...उन्हाळ्यात नैसर्गिकरीत्या उत्पादन नियंत्रित होत...
औरंगाबाद येथे कैरी २५०० ते ३००० रुपये... औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नागपूर बाजारात हरभरा, तुरीच्या दरांत...नागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा, तूर,...
कोल्हापुरात हिरवी मिरची दहा किलोस ३००...कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ९६०० ते १७९००...नगर ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात...
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
सांगलीत हळद ६००० ते १५,००० रुपये क्विंटलसांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागली...
जळगावमध्ये कैरी ७००० रुपये क्विंटल जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगरला ज्वारी १५५० ते २१५१ रुपयेनगर ः नगर बाजार समितीत गत सप्ताहात ज्वारीची ८८४...
सोलापुरात कांद्याचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
परभणीत फ्लॉवर ३०० ते ७०० रुपये क्विंटल परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
जळगाव येथे हिरवी मिरची १५०० ते ४०००...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...