पुण्यात गवार, हिरवी मिरची, भेंडीच्या दरात सुधारणा

पुणे बाजार समितीत झालेली पालेभाज्यांची व टोमॅटोची आवक.
पुणे बाजार समितीत झालेली पालेभाज्यांची व टोमॅटोची आवक.

पुणे ः  गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ७) भाजीपाल्याची सुमारे २०० ट्रक आवक झाली हाेती. मात्र काही भाजीपाल्यांच्या आवक सरासरी असून, मागणी असल्याने भेंडी, गवार, हिरवी मिरचीच्या दरात वाढ झाली हाेती, तर बहुतेक भाजीपाल्याचे दर स्थिर हाेते.  बाजार समितीमध्ये परराज्यांतून भाजीपाल्याच्या झालेल्या आवकेमध्ये मध्य प्रदेशातून सुमारे २० ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ४ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १८ टेंपो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ टेंपो शेवगा, राजस्थान येथून १२ ट्रक गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ४ हजार गोणी आवक हाेती. तर स्थानिक आवकेत सातारी आले सुमारे १ हजार गाेणी, टॉमेटोची सुमारे ६ हजार क्रेट, हिरवी मिरची सुमारे ४ टेंपो, फ्लॉवर २० तर काेबी सुमारे २२ टेंपाे, ढोबळी मिरची सुमारे १२ टेंपो, पावटा ६ टेंपो, वांगी ८ टेंपो, तांबडा भोपळा १० टेंपो, गवार ४ टेंपो, भेंडीची ५ टेंपो, स्थानिक मटारची अवघी ६० गाेणी, तर नवीन कांद्याची सुमारे १७५ ट्रक, तर आग्रा, इंदूर आणि स्थानिक भागातून बटाट्याची सुमारे ६५ ट्रक आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव कांदा : नवीन ३००-३८० जुना ४००-४५०, बटाटा : ६०-१२०, लसूण : १५०-३००, आले सातारी : १८०-२००, बंगलाेर २६०-२८०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ५००-६००, टोमॅटो : ५०-१००, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ४००-५००, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१४०, कारली : हिरवी ३५०-४००, पांढरी : २५०-२६०, पापडी : १५०-१६०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : ५०-८०, वांगी : २००-२५०, डिंगरी : १४०-१५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ५००, गाजर : १६०-१८०, वालवर : २४०-२५०, बीट : ८०-१००, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १४०-१८०, ढेमसे : २००-२५०, मटार : स्थानिक ३५०, परराज्य २८०-३००, पावटा : ३००-३५०, तांबडा भोपळा : १००-१६०, सुरण : २६०-२८०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे पावणेदाेन लाख, तर मेथीची ७५ हजार जुड्या आवक झाली हाेती. कोथिंबीर : ३००-७००, मेथी : ३००-५००, शेपू : ३००-५००, कांदापात : ६००-१०००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-४००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-७००, पालक : ४००-६००, हरभरा - ४००-८००

फूलबाजार जिल्ह्यात वाढलेल्या थंडीचा परिणाम गुलछडी, लिली, कटफ्लॉवर आदी फुलांवर झाल्याने उत्पादनातात घट झाली आहे. आवक सरासरी असून, मागणी तुलनेने घटली आहे. असे व्यापाऱ्यांनी सांगितले.  फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ४०-८० बिजली : २०-४०, कापरी : १०-३०, शेवंती : ३०-७०, ॲस्टर : ५-१०, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : १०-२०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ४०-१००, लिली बंडल : ३-५, अबोली लड : २००-३००, जरबेरा : १०-२०, कार्नेशियन : ६०-१२०.

फळबाजार रविवारी (ता. ७) फळ विभागात जुन्या बहराच्या मोसंबीची सुमारे ३०, तर नव्या बहराची सुमारे १५ टन, संत्री १० टन, डाळिंब सुमारे ३० टन, पपई २० टेंपोे, लिंबे सुमारे ५ हजार गोणी, चिकू ७०० गाेणी, पेरू ६०० ते  ७०० क्रेट्स, कलिंगड १० टेंपो, खरबूज ६ टेंपो आवक झाली हाेती. तर विविध जातींची बोरांची सुमारे अडीच हजार गोणी, द्राक्षे १२ टन, स्ट्रॉबेरी पाच टन इतकी आवक झाली हाेती.  फळांचे दर पुढीलप्रमाणे  लिंबे (प्रति गोणी) : १५०-१८०, मोसंबी : (३ डझन) : १४०-४००, (४ डझन) : ६०-२५०, संत्रा : (३ डझन) १८०-३०० , (४ डझन) : १२०-२००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-८०, गणेश १०-३०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१३, खरबूज : १०-२५ पपई  : ३-१५, चिकू : १००-६००, पेरू (२० किलो) : ३५०-५००, सफरचंद : सिमला (२५ किलो) : १२००-१८००, काश्मीर डेलिशियस (१५ किलो) ७००-१४००, किन्नोर : (२५ किलो) २०००-२५००, अमेरिकन डेलिशियस : (१५ किलो) ११००-१४००, महाराजा (१५ किलो) : ६००-८००. बोरे : चेकनट (१० किलो) २८०-३२०, चण्यामण्या : ४००-५००, चमेली : ८०-११०, उमराण : ३५-५०, द्राक्षे : तासगणेश (१५ किलो) ७००-१०००, सुपर सोनाका (१५ किलो) : ८००-१४००, जंबो (१० किलो) : ४००-१०००, शरद (१० किलो) : ४००-८००, सोनाका (१५ किलो) : ७००-१०००, सरिता (१० किलो) १०००-१२०० स्ट्रॉबेरी (२ किलाे) १००-२०० 

मटण मासळी गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ७) खोल समुद्रातील सुमारे १० टन, खाडीची ४०० किलाे, आणि नदीतील सुमारे ८०० किलो, तर आंध्र प्रदेशातून धरणातील रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १२ टन आवक झाली आहे. गेल्या आठवड्यातील महाराष्ट्र बंद, शुक्रवारी झालेली संकष्ट चतुर्थीमुळे मागणी घटली हाेती. मात्र रविवारी मागणी वाढल्याने विविध मासळींचे दर टिकून हाेते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. भाव (प्रतिकिलो) पापलेट ः कापरी ः १५००, मोठे ः १४००, मध्यम ः ९००, लहान ः ६५०-७५०, भिला ः ५५०, हलवा ः ४८०, सुरमई ः४४०- ४८०, रावस लहान ः ४८०, मोठा ः ५५०, घोळ ः ५५०, करली ः २८०, करंदी (सोललेली) ः २४०, भिंग ः २००, पाला : ६००-१३००, वाम ः पिवळी ४००-७००, काळी : ३६०, ओले बोंबील ः १००-१४० कोळंबी ः लहान : २४०, मोठी : ५००, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स ः ८००, लॉबस्टर ः १५००, मोरी : २००- २८०, मांदेली : १००, राणीमासा : १६०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०. खाडीची मासळी ः सौंदाळे ः २४०, खापी ः १८०, नगली ः ३६०-४८०, तांबोशी ः ३६०, पालू ः २००, लेपा ः १४०-२००, शेवटे : २४०, बांगडा : १००, माेठी १८०, पेडवी ः ५०-६०, बेळुंजी ः १२०, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, तारली : १०० नदीची मासळी ः रहू ः १६०, कतला ः १८०-२००, मरळ ः ४८०, शिवडा : २००, चिलापी : ५०-८०, मांगूर : १४०, खवली : २००, आम्ळी ः ८०, खेकडे ः २००, वाम ः ५०० मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८० चिकन ः चिकन ः १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६० अंडी ः गावरान - शेकडा : ७८०, डझन : १०८, प्रति नग : ९ इंग्लिश शेकडा : ४००, डझन : ६०, प्रतिनग : ५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com