agriculture news in marathi, The General Assembly's leaders are afraid | Agrowon

सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसका
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

जळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८ तारखेला होणार असून, या सभेत जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीचे रखडलेले नियोजन, गत काळात ग्रामविकासासंबंधीच्या कामांमध्ये निधीचे झालेले असमान वाटप हे मुद्दे गाजण्याची शक्‍यता आहे. सत्ताधाऱ्यांमधील दुफळीचा लाभ विरोधक उचलून प्रशासनाची कोंडी करण्याची तयारी विरोधक करीत आहेत.

जळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८ तारखेला होणार असून, या सभेत जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीचे रखडलेले नियोजन, गत काळात ग्रामविकासासंबंधीच्या कामांमध्ये निधीचे झालेले असमान वाटप हे मुद्दे गाजण्याची शक्‍यता आहे. सत्ताधाऱ्यांमधील दुफळीचा लाभ विरोधक उचलून प्रशासनाची कोंडी करण्याची तयारी विरोधक करीत आहेत.

ही सभा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील छत्रपती शाहू महाराज सभागृहात दुपारी दोन वाजता होईल. प्रशासनाने काही सत्ताधाऱ्यांच्या दबावात भजनी मंडळांना साहित्य वाटप, शाळांमध्ये पॉलीबाकांचा पुरवठा यासंबंधीच्या निविदांमध्ये गडबड करायचा, निविदा लटकवून ठेवायचा प्रयत्न मागील पाच सहा महिने केला आहे. हे मुद्देदेखील चर्चेत असून, विरोधक आवाज उठवतील, असे संकेत मिळत आहेत.

जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांनी ग्रामविकासासंबंधी निधीचे वाटप करताना कमी अधिक निधी दिला. काही सदस्यांना तो अत्यल्प मिळाला. अमळनेर, पारोळा, पाचोरा व जळगाव तालुक्‍यात असमान निधी वाटपाच्या तक्रारी अधिक आहेत. जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांमधील एका गटातील सदस्यांनाही निधी देताना दुजाभाव झाल्याचा दावा केला जात आहे. यावरूनही सत्ताधाऱ्यांमध्ये रणकंदन होऊ शकते.

सभेत नियमित १३ विषय मंजुरीसाठी घेतले आहेत. या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे विषय ऐनवेळी मंजुरीसाठी घेतले जाऊ शकतात. परंतु काही आर्थिक विषय, घोरणात्मक विषय आयत्या वेळी मंजुरीसाठी सत्ताधाऱ्यांनी ठेवल्यास ते नाकारण्याची भूमिका विरोधक घेत असून, सत्ताधाऱ्यांचा विश्‍वास त्यासाठी कसा मिळवायचा याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे प्रशासन व पदाधिकारी यांच्यात सभेतील विषय व सध्या चर्चेत असलेले मुद्दे यावर चर्चा झाली असून, सभा शांततेत पार पाडण्यासंबंधीची तयारी सुरू आहे.

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...