agriculture news in marathi, generation gaps tensions family life | Agrowon

कौटुंबिक संवादाअभावी मानसिक स्वास्थ धोक्‍यात
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

महाविद्यालयीन तरुणांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये उघड
पुणे : भावनिक आधार आणि कौटुंबिक संवादाच्या अभावामुळे महाविद्यालयीन तरुणांचे मानसिक स्वास्थदेखील धोक्‍यात येत आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाने तरुणांच्या केलेल्या वैद्यकीय तपासणीत अशी काही उदाहरणे समोर आली आहेत.

महाविद्यालयीन तरुणांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये उघड
पुणे : भावनिक आधार आणि कौटुंबिक संवादाच्या अभावामुळे महाविद्यालयीन तरुणांचे मानसिक स्वास्थदेखील धोक्‍यात येत आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाने तरुणांच्या केलेल्या वैद्यकीय तपासणीत अशी काही उदाहरणे समोर आली आहेत.

महाविद्यालयीन प्रथम वर्षाच्या प्रवेशावेळी वैद्यकीय तपासणी सक्तीची असते. याबरोबरच मॉडर्न   महाविद्यालयाच्या प्रशासन आणि  मानसशास्र विभागाने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मानसिक स्वास्थ तपासणी केली. त्यांची मानसिकता ओळखू येईल, अशा पद्धतीची प्रश्‍नावली त्यांना देण्यात आली. सुमारे एक हजार ३०० जणांची ही तपासणी झाली. यातील अडीच ते तीन टक्के विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती संवेदनशील पातळीवर असल्याचे दिसून आले.

मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. झुंजारराव म्हणाले, ‘‘गेल्या तीन वर्षांपासून आम्ही मानसिक स्वास्थ्य तपासणी करून घेतो. यातून विद्यार्थ्यांचे स्वाभाविक दोष समजतात. आक्रमकपणा, नैराश्‍य, असमतोल विचारसरणी आदी लक्षणे या तपासणीतून दिसून आली आहेत. त्यांना समुपदेशनाची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर काही जणांच्या पालकांनादेखील कळविण्यात आले.’’

पाल्यामध्ये असामान्य वृत्तीची लक्षणे दिसून येत असली, तरी अनेक पालकांना ते मान्य नसते. ‘मुलगा फक्त हट्टी आहे, बाकी काही नाही,’ अशी पालकांची भूमिका असते. यातून धोके उद्‌भविण्याची शक्‍यता असते. अनेक जण टोकाचे पाऊल उचलण्याचादेखील धोका असतो. पण औषधोपचारानंतर विद्यार्थ्याची वागणूक सुधारत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे पालकांनी तरुण मुलांच्या असामान्य वागणुकीकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन डॉ. झुंजारराव यांनी केले आहे.

खरी गरज संवादाची!
महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख अमृता ओक म्हणाल्या, ‘‘भावनिक आधार न मिळणे, वडिलांचा किंवा आईचा अतिधाक, तरुणांच्या विचारांवर नको तेवढे अतिक्रमण अशा काही कारणांमुळे तरुणांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. त्यासाठी कौटुंबिक संवाद वाढविला पाहिजे आणि कुटुंबात सलोखादेखील राखला गेला पाहिजे.’’

मॉडर्न महाविद्यालय स्तरावर मानसिक स्वास्थ्य तपासणी सुरू केली आहे. यात दोन ते तीन टक्के विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य धोक्‍याच्या पातळीवर आढळते. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेऊन सर्वच महाविद्यालयांमध्ये मानसशास्त्र विभागामार्फत अशी चाचणी घेण्याची पद्धत सुरू करावी. यातून पुढे घडणारे अनुचित प्रकार टळू शकतील.
- डॉ. आर. एस. झुंजारराव 
प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

इतर ताज्या घडामोडी
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...