agriculture news in marathi, get order of mafrming road, pipeline of the state minister. | Agrowon

शेतरस्ते, कृषिपंपांबाबत राज्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे आदेश
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

जळगाव  : शेतरस्ते, वीज प्रश्‍न, कृषिपंपांबाबतच्या तक्रारी आदी मुद्यांवरून नुकतीच राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात राज्यमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावत, खड्डे बुजविले नाहीत आणि रखडलेल्या वीज जोडण्या कृषिपंपांबाबत तातडीने द्याव्यात, असे आदेश दिले.

जळगाव  : शेतरस्ते, वीज प्रश्‍न, कृषिपंपांबाबतच्या तक्रारी आदी मुद्यांवरून नुकतीच राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात राज्यमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावत, खड्डे बुजविले नाहीत आणि रखडलेल्या वीज जोडण्या कृषिपंपांबाबत तातडीने द्याव्यात, असे आदेश दिले.

शहरात पंचायत समितीच्या सभागृहात आज जळगाव ग्रामीणमधील विविध विषयांवर आढावा बैठक झाली, तीत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य पवन सोनवणे, प्रताप पाटील, ज्ञानेश्‍वर महाराज यांच्यासह तहसीलदार अमोल निकम व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, गटविकास अधिकरी शशिकांत सोनवणे, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह वीज वितरण, बांधकाम तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

खड्ड्यांच्या तक्रारी
बांधकाम विभागाचा आढावा घेत असताना रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याचे दिसून आले. असोदा- शेळगाव, असोदा- तरसोद, भादली- शेळगाव या रस्त्यांवर खड्डे पडले असल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी केल्या. राज्यमंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली, तसेच हे खड्डे तातडीने बुजवावेत; अन्यथा त्याच खड्ड्यांत आपण तुम्हाला टाकू, अशी तंबीही दिली.

रस्त्याच्या कामांसाठी अभियंते "कमिशन''ची मागणी करतात, अशी तक्रार उपस्थित नागरिकांनी केली. यावेळी अभियंता बी. डी. पवार व शेखर शिंपी यांनाही मंत्र्यांनी विचारणा केली. त्यावेळी पंचायत समितीच्या उपसभापतींनीही आपल्याकडून पैसे मागितले असल्याचे सांगितले. मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मस्कर यांनी चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

 

इतर बातम्या
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
उत्तर महाराष्ट्रात टंचाईच्या झळा तीव्रनाशिक : भूजल पातळीत वेगाने घट होत असल्याने उत्तर...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
‘वसाका`च्या गळीत हंगामास प्रारंभकळवण, जि. नाशिक : विठेवाडी येथील वसंतदादा पाटील...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
शेतीप्रश्नांसाठी तरुणांच्या चळवळीची गरज...वैराग, जि. सोलापूर : ‘‘शेतीचे प्रश्न वाढतायेत, ते...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...