agriculture news in marathi, Gholap, Jangte, Hande retired from Agri Department | Agrowon

कृषी खात्यातील मच्छिंद्र घोलप, महावीर जंगटे, गोविंद हांडे निवृत्त
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

पुणे : कृषी खात्यातील संचालक मच्छिंद्र घोलप, सहसंचालक महावीर जंगटे तसेच तंत्र अधिकारी गोविंद हांडे हे तीन ज्येष्ठ अधिकारी नुकतेच निवृत्त झाले. श्री. घोलप यांची काही दिवसांपूर्वीच राज्याच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. सहसंचालक म्हणून काम करीत असताना श्री. घोलप यांच्याकडे गेल्या ९ महिन्यांपासून गुणनियंत्रण संचालकपदी तात्पुरती सूत्रे देण्यात आली होती. त्यांनी या पदावरील अवघड कामे व्यवस्थित पार पाडली. 

पुणे : कृषी खात्यातील संचालक मच्छिंद्र घोलप, सहसंचालक महावीर जंगटे तसेच तंत्र अधिकारी गोविंद हांडे हे तीन ज्येष्ठ अधिकारी नुकतेच निवृत्त झाले. श्री. घोलप यांची काही दिवसांपूर्वीच राज्याच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. सहसंचालक म्हणून काम करीत असताना श्री. घोलप यांच्याकडे गेल्या ९ महिन्यांपासून गुणनियंत्रण संचालकपदी तात्पुरती सूत्रे देण्यात आली होती. त्यांनी या पदावरील अवघड कामे व्यवस्थित पार पाडली. 

यवतमाळमधील कीटकनाशकाच्या विषबाधेमुळे घडून आलेले शेतकरी मृत्यू प्रकरण तसेच गुलाबी बोंड अळीमुळे राज्यभर करण्यात आलेले पंचनामे या दोन्ही घटनांमध्ये श्री. घोलप यांनी कृषी खात्याची बाजू भक्कमपणे हाताळली होती. कृषी विभागाच्या कोल्हापूर विभागाचे सहसंचालक म्हणून काम पहाणारे महावीर जंगटे हे निवृत्त झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम सहसंचालकांना करावे लागते. मृदसंधारण व जलसंधारण घोटाळ्यांमुळे काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन, कोर्टकचेऱ्या झालेल्या असतानाही श्री. जंगटे यांनी कामकाज निभावून नेले. या आधी त्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानचे प्रकल्प संचालक व ठाण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून श्री. जंगटे यांनी यशस्वीपणे काम केले. 

राज्याच्या शेतकऱ्यांना निर्यातीसाठी मंत्र देणारे कृषी खात्याच्या निर्यात विभागातील तंत्र अधिकारी गोविंद हांडे देखील ३३ वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाले. निर्यातीचा मंत्र ही ५० भागांची अॅग्रोवनमधून त्यांनी लिहिलेली मालिका अतिशय मोलाची ठरली. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी कमाल उर्वरित अंश संनियंत्रण प्रणाली (रेसिडयू मॉनिटरींग प्लॅन) लागू करून ग्रेपनेट ही यंत्रणा विकसित करण्यात श्री. हांडे यांनी पुढाकार घेतला. अपेडा, द्राक्ष बागायतदार संघ, एनआरसी यांच्यात त्यांनी उत्तम समन्वय निर्माण केला होता. १३ फळपिकांना भौगोलिक चिन्हांकन मिळवून देण्यात हांडे यांचा मोलाचा वाटा आहे.

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...