agriculture news in Marathi, Ginger at 5000 rupees at Nagpur, Maharashtra | Agrowon

आल्याचे दर पोचले ५००० रुपये क्‍विंटलवर
विनोद इंगोले
मंगळवार, 1 मे 2018

नागपूर ः मसालावर्गीय पिकात समावेशीत असलेल्या आल्याने या आठवड्यात चांगलाच भाव खात दरात मोठी मुसंडी मारली आहे. आल्याचे दर गेल्या आठवड्यात सुरवातीला ३००० ते ३२०० रुपये क्‍विंटल होते. लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने आणि आवक मंदावल्याने तेजी आली आहे. आल्याचे दर कळमणा बाजार समितीत ४००० ते ५००० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत.
 

नागपूर ः मसालावर्गीय पिकात समावेशीत असलेल्या आल्याने या आठवड्यात चांगलाच भाव खात दरात मोठी मुसंडी मारली आहे. आल्याचे दर गेल्या आठवड्यात सुरवातीला ३००० ते ३२०० रुपये क्‍विंटल होते. लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने आणि आवक मंदावल्याने तेजी आली आहे. आल्याचे दर कळमणा बाजार समितीत ४००० ते ५००० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत.
 
विदर्भात सर्वदूर उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. सूर्य आग ओकत असतानाच सर्वदूर भाजीपाल्याला मागणी वाढत त्याचेही दर वाढीस लागले आहेत. आल्याचे दर ३००० ते ३२०० रुपये क्‍विंटलवरून थेट ४००० ते ५००० रुपये क्‍विंटलवर पोचले. लसणाचे दर १५०० ते २५०० रुपये क्‍विंटलचे गेल्या आठवड्यात होते. त्यात घसरण होत हे दर १००० ते २५०० रुपयांवर पोचल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. पांढऱ्या कांद्याच्या दरातही गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट नोंदविण्यात आली आहे. सुरवातीला पांढरा कांदा  ६०० ते ७०० रुपये क्‍विंटल होता.

 २८ एप्रिल रोजी पांढऱ्या कांदयाचे दर ४०० ते ७०० रुपये क्‍विंटलपर्यंत खाली आले. लाल कांदा ८०० ते १००० रुपये क्‍विंटल होता. त्याच्या दरातही घसरण झाली असून लाल कांदयाचे व्यवहार ६०० ते ९०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. टोमॅटोचे व्यवहार ६०० ते ८०० रुपये क्‍विंटलने गेल्या आठवड्यात होत होते. २८ एप्रिल रोजी टोमॅटोची १०० क्‍विंटल आवक होत दर ७०० ते १००० रुपये क्‍विंटलवर पोचले.

चवळी शेंगाची पण बाजारात आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगीतले. १४० ते १५० क्‍विंटल अशी चवळी शेंगाची रोजची आवक आहे. सुरवातीला १५०० ते २००० रुपये क्‍विंटल असलेले चवळी शेंगाचे दर मध्यंतरी घसरत १००० ते १५०० रुपये क्‍विंटलवर पोचले. त्यानंतर आता पुन्हा १५०० ते २००० रुपये क्‍विंटलने चवळी शेंगांचे व्यवहार होत आहेत. 

ज्वारीची जेमतेम आवक 
२००० ते २४०० असा सुरवातीचा दर असलेल्या ज्वारीचे व्यवहार नजीकच्या काळात २००० ते २२०० रुपयांने होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांकडून देण्यात आली. ज्वारीची आवक ५ ते १७ क्‍विंटल अशी जेमतेम आहे. सरबती गहू २५०० ते २८०० रुपये क्‍विंटल होता.  आता २५०० ते २९०० रुपयांपर्यंत गहू वधारला. सरबती गव्हाची ५०० ते ५५० क्‍विंटल अशी सरासरी आवक आहे. हरभरा दर ३००० ते ३२०० रुपये क्‍विंटल आहेत. तूरीची व्यवहार ३२०० ते ३९०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. गेल्या आठवडाभरापासून अपवाद वगळता तूर खरेदी याच भावाने होत आहे. कळमणा बाजार समितीत सोयाबीनची सरासरी २५० क्‍विंटल आवक आहे. ३२०० ते ३६०० रुपये क्‍विंटलने सोयाबीन चे व्यवहार झाले.

इतर ताज्या घडामोडी
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...