agriculture news in Marathi, Ginger, flower, matter rates increased in Pune, Maharashtra | Agrowon

पुण्यात आले, घेवडा, फ्लॉवर, मटारच्या दरात वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 एप्रिल 2018

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ८) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक मंदावली असून, आले, घेवडा, फ्लाॅवर, मटारच्या दरात वाढ झाली अाहे. तर इतर बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर हाेते. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम हाेते. 

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ८) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक मंदावली असून, आले, घेवडा, फ्लाॅवर, मटारच्या दरात वाढ झाली अाहे. तर इतर बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर हाेते. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम हाेते. 

आवकेमध्ये परराज्यांतून हिमाचल प्रदेशातून अवघी १ मटार, राजस्थान येथून गाजर सुमारे ३ ट्रक, गुजरात आणि कर्नाटकातून काेबी सुमारे ४ ट्रक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून हिरवी मिरची सुमारे १५ टेंपाे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून शेवगा सुमारे ५ टेंपाे आवक झाली हाेती. कर्नाटकातून ताेतापुरी कैरी सुमारे ६ टेंपाे, तर मध्य प्रदेश, गुजरात येथून लसणाची सुमारे ४ हजार गाेणी आवक झाली हाेती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० गाेणी, टाेमॅटाे सुमारे ५ हजार क्रेट, हिरवी मिरची ५ टेंपो, सिमला मिरची १५ टेंपाे, काेबी १० तर फ्लॉवर सुमारे १५ टेंपो, काकडी १० ते १२ टेंपो, मटार २०० गाेणी, पावटा ४ टेंपाे, शेवगा ५ टेंपाे, तांबडा भाेपळा १२ टेंपाे, भेंडी ८, तर गवार ५ टेंपाे, स्थानिक गाजर सुमारे ३०० गाेणी आवक झाली हाेती. तर कांदा सुमारे १२५ ट्रक, आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : ६५-८०, बटाटा : १२०-१६०, लसूण : १५०-३०० आले : सातारी : ३००-३२०, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान - सुरती २५०-४००, टोमॅटो : ३०-६०, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १६०-१८०, काकडी : ६०-८०, कारली : हिरवी १८०-२००, पांढरी : ९०-१००, पापडी : १४०-१५०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ५०-८०, कोबी : २०-४०, वांगी : १००-२००, डिंगरी : १४०-१६०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : ९०-१००, शेवगा : १५०-२००, गाजर : स्थानिक ६०-८०, परराज्य. १००-१४०, वालवर : १४०-१६०, बीट : ४०-६०, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ३००-४००, मटार : स्थानिक, परराज्य ४५०-५००, तांबडा भोपळा : ४०-८०, चिंच अखंड ३००-३२०, फाेडलेली ६००-६५०, सुरण : २४०-२५०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे दीड लाख, मेथीची सुमारे १५ हजार जुड्या आवक झाली हाेती. 
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव ः कोथिंबीर : ३००-१२००, मेथी : १०००-१४००, शेपू : ७००-१०००, कांदापात : ४००-७०० चाकवत : ५००-७००, करडई : ४००-५००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ५००-८००, मुळे : ५००-८०० राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-८००, चवळई : ५००-६००, पालक : ४००-७००, हरभरा गड्डी ४००-६००

फळबाजार
रविवारी (ता. ८) फळबाजारात मोसंबी सुमारे ५० टन, संत्री २० टन, डाळिंब ३५ टन, पपई १० टेंपोे, लिंबे सुमारे ३ हजार ५०० गोणी, चिकू २ हजार डाग, पेरू ७० क्रेटस्, कलिंगड ४० तर खरबूज २५ टेंपो, काेकणातून हापूस आंबा सुमारे ७ हजार पेटी, द्राक्षे सुमारे ६ टन आवक झाली हाेती.
फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-११००, मोसंबी : (३ डझन) : १६०-४००, (४ डझन) : ६०-२२०, संत्रा : (३ डझन) २००-४००, (४ डझन) : १००-२२०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१२०, गणेश १०-४०, आरक्ता २०-६०, कलिंगड : ५-१०, खरबूज : ५-१८, पपई  : ५-१५, चिकू : १००-५००, पेरू (२० किलो) : ३००-५०० सफरचंद : सिमला (२५ किलो) : १५००-१७००, काश्मीर डिलिशियस (१५ किलो) ९००-१२००, किन्नोर : (२५ किलो) १८००-२०००, सिमला : (२५ किलो) १५००-१८००. द्राक्षे : ताश ए गणेश (१५ किलो) ८००-१०००, सुपर सोनाका (१५ किलो) : १२००-१४००, थॉमसन (१५ किलो) : ५५०-६५०. आंबा : लालबाग (प्रतिकिलाे) ४०-७०, बदाम ५५-७०, कर्नाटक : पायरी (२ डझन) २५०-४५०, हापूस (२ डझन) ४५०-७००, तोतापुरी (प्रतिकिलाे) ५०-७०. काेकण हापूस कच्चा (४-६ डझन) २ ते २ हजार ५००, (६-१०) २ हजार ५००-४ हजार तयार (४-६) २ हजार ५०० ते ३ हजार ५००, (६-१०) ३ ते ५ हजार रुपये.

फुलबाजार
ढगाळ हवामानामुळे फुलांच्या आवकेत वाढ झाली आहे. 
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-६०, गुलछडी : ६०-१५०, बिजली : २०-५०, कापरी : १६-२५, ऑस्टर : ८-२०, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : ८-१५ ग्लॅडिएटर : १०-१२, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ३०-७०, लिली बंडल : २-८ जरबेरा : १०-२५, कार्नेशियन : २०-६०, मोगरा : ६०-३००.

मटण मासळी
रविवारी (ता. ८) गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील सुमारे १० टन, खाडीची सुमारे ३०० किलो, नदीची सुमारे दीड टन तर आंध्र प्रदेश येथून रहू, कटला, सिलनची सुमारे १२ टन आवक झाली हाेती. या वेळी मागणी वाढल्याने दरात ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.  

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे : १४००, मध्यम : १०००, लहान : ८५०, भिला : ६००, हलवा : ६००, सुरमई : ६००-७००, रावस-लहान : ६५०,  मोठा : ८५०, घोळ : ५५०, करली : २८०, करंदी : सोललेली  २८०, भिंग : ३६०, पाला : ५५०-१३००, वाम : पिवळी ३२०, मोठी ५५० , ओले बोंबील : १८०

 कोळंबी ः लहान : २४०, मोठी : ४८०, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ८५०, लॉबस्टर : १५००, मोरी : २००-३६०, मांदेली : १२०, राणीमासा : २४०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४४०.
खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी : २४०, नगली : ४००, तांबोशी : ४४०, पालू : २००, लेपा : २०० शेवटे : २८०, बांगडा : लहान : १२०, मोठे : १८०, पेडवी : ८०, बेळुंजी : १४०, तिसऱ्या : १८०-२०० खुबे : १४०, तारली : १२० 
नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ४००, शिवडा : २२०, चिलापी : ६०, मागुर : १५०, खवली : २२०, आम्ळी : १०० खेकडे : २४०, वाम : ५५०

चिकन, मटण
 मटण
: बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०. 
चिकन : चिकन : १३०, लेगपीस : १७० जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०. 
अंडी : गावरान : शेकडा : ५८०, डझन : ८४ प्रतिनग : ७. इंग्लिश : शेकडा : ३१२ डझन : ४८ प्रतिनग : ४.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...
सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...
गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...
परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...