agriculture news in Marathi, ginger loss due to pest attack, Maharashtra | Agrowon

बुरशी, जिवाणू, सूत्रकृमीमुळेच आले पिकाचे नुकसान
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

औरंगाबाद: जिल्ह्यातील आले पिकाचे २०१५-१६ व २०१८-१९ या वर्षात बुरशी, जिवाणू व सूत्रकृमी यांच्यामुळेच मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची बाब प्रयोगशाळेतील तपासणीतून समोर आल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे वनस्पती विकृतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. के. टी. आपेट यांनी दिली. 

औरंगाबाद: जिल्ह्यातील आले पिकाचे २०१५-१६ व २०१८-१९ या वर्षात बुरशी, जिवाणू व सूत्रकृमी यांच्यामुळेच मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची बाब प्रयोगशाळेतील तपासणीतून समोर आल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे वनस्पती विकृतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. के. टी. आपेट यांनी दिली. 

यासंदर्भात अधिक माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आले पिकाची लागवड केली जाते. पैसे देणारे मसालावर्गीय पीक म्हणून शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड, फूलंब्री व खुल्ताबाद या चार तालुक्‍यांत आले पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. २०१५-१६ व २०१८-१९ या वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील आले पिकावर मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादूर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

नुकसानीची संभाव्य कारणे शोधण्यासाठी डॉ. आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज कदम, आशुतोष पाटील, नयन कवठे आदी विद्यार्थ्यांनी कन्नड, सिल्लोड, फूलंब्री व खुल्ताबाद आदी तालुक्‍यांतील बाधीत प्रक्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी व रोगग्रस्त पिकांचे कंद, माती, पाने व खोड आदींचे नमुने घेऊन ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. 

या तपासणीत पिथीअम ॲफॅनीडरमॅटम, फ्युजॅरीअम ऑक्‍झीस्पोरम, स्क्‍लेरोशीयम रॉल्फ्सी या रोगकारक बुरशी तर रायस्टोनिया सोलॅनॅसीरम हा रोगकारक जीवाणू व मेलोडोगाईन सूत्रकृमी हे सर्व घटक कंदमर रोगास कारणीभूत असल्याचे व त्यामुळे नुकसान झाल्याचे समोर आल्याचे प्रा. आपेट यांनी स्पष्ट केले. या रोगकारक बुरशी, जीवाणू व सुत्रकृमी एकत्रितपणे किंवा स्वतंत्रपणेही पिकात रोग निर्माण करतात. त्यामुळे पिकाचे ५० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होत असल्याचे प्रा. आपेट यांनी नमूद केले. 

शास्त्रोक्‍त काळजीपूर्वक पूर्वमशागत, बेणेप्रक्रिया करताना काळजी घेतल्यास होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण मिळू शकत असल्याचे प्रा. आपेट यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर शिफारसीनुसार बुरशीनाशके, जीवाणूनाशके यांचा वापर केल्यास रोगांवर प्रतिबंध येण्यास मदत मिळेल असेही त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...