agriculture news in marathi, ginger plantation delay, satara, maharashtra | Agrowon

उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले लागवड रखडणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे महिन्यात उष्णतेत होत असलेल्या वाढीमुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरू होणारी आले लागवड यावर्षीही रखडणार आहे. आल्याच्या दरात होत असलेल्या सुधारणेमुळे मागील दोन वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील आले पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. 

सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे महिन्यात उष्णतेत होत असलेल्या वाढीमुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरू होणारी आले लागवड यावर्षीही रखडणार आहे. आल्याच्या दरात होत असलेल्या सुधारणेमुळे मागील दोन वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील आले पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. 

अपुऱ्या पावसाचा इतर पिकांप्रमाणे आले पिकालाही फटका बसताना दिसत आहे. जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी आले लागवड करतात. मात्र, सध्या उष्णता वाढल्याने आले लागवड सुरू झालेली नाही. मागील तीन ते चार वर्षांपासून हीच परिस्थिती निर्माण झाल्याने आल्याच्या एकुण उत्पादनावर परिणाम झालेला आहे. या हंगामात नदीकाठी व कालव्याचे पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी आले लागवडीसाठी पूर्वमशागत सुरू झाली आहे. यामध्ये रोटर मारणे, बेड सो़डणे, खताची पेरणी करणे तसेच तयार बेडवर ठिबक टाकणे या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात साधारणपणे २५०० हेक्‍टरवर आल्याची लागवड होते. मात्र मुहूर्तावर यातील सुमारे ५ ते १० टक्के क्षेत्रावरदेखील आल्याची लागवड  झाली नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

आले उत्पादक शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. सध्या तापमान वाढले आहे. वाढलेल्या तापमानामुळे लागवड केलेल्या आल्याची उगवण उशिरा होते. तसेच उत्पादनावर परिणाम होतो. सध्या संथ गतीने सुरू असलेली आले लागवड जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात गतीने होणार आहे. मात्र, पावसाचे आगमन उशिरा झाल्यास आले लागवड पुढे धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. उशिरा आले लागवड झाल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम असतो. 

  • आले पिकाचे सध्याचे दर  : विक्रीचे आले प्रतिगाडी (५०० किलो) ः ३८ ते ४० हजार रुपये 

 
आले पिकाकडे कल वाढला
मागील वर्षापासून आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षीही दर टिकून राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, आले लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र, बियाण्यांचे दर प्रतिगाडीस ३५ हजारांवर गेल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. बियाण्यांच्या वाढलेल्या दरामुळे आले पिकाच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ होणार नसली, तरी शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होईल.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...