agriculture news in marathi, Ginning mills to get subsidized electricity | Agrowon

यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २ रुपये प्रतियुनिट वीज दर सवलत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८ ते २३ अंतर्गत आमदार सुरेश हाळवणकर यांच्या एकसदस्यीय समितीने केलेल्या शिफारशींना अनुसरून वस्त्रोद्योगातील साधे यंत्रमागधारक, सहकारी सूतगिरण्या तसेच सायझिग, प्रोसेसिंग, गारमेंट व इतर घटकांना वीज दरात सवलत देण्याचा निर्णय सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. या निर्णयाने यंत्रमाग वीजग्राहकांना १ रुपये, सायझिग, प्रोसेसिंग, गारमेंट, आधुनिक यंत्रमाग ग्राहक व इतर घटकांना २ रुपये प्रतियुनिट अधिकची सवलत मिळेल.

मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८ ते २३ अंतर्गत आमदार सुरेश हाळवणकर यांच्या एकसदस्यीय समितीने केलेल्या शिफारशींना अनुसरून वस्त्रोद्योगातील साधे यंत्रमागधारक, सहकारी सूतगिरण्या तसेच सायझिग, प्रोसेसिंग, गारमेंट व इतर घटकांना वीज दरात सवलत देण्याचा निर्णय सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. या निर्णयाने यंत्रमाग वीजग्राहकांना १ रुपये, सायझिग, प्रोसेसिंग, गारमेंट, आधुनिक यंत्रमाग ग्राहक व इतर घटकांना २ रुपये प्रतियुनिट अधिकची सवलत मिळेल. तसेच सूतगिरण्यांना ३ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार असून, या संदर्भात लवकरच शासन निर्णय जारी केला जाणार असल्याचे आमदार हाळवणकर यांनी सांगितले. 

राज्यातील साध्या यंत्रमागधारकांना महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या वीज दरात शासन पूर्वीपासून २.७७ रुपये सबसिडी देते. या रकमेत वाढ करून ३.७७ रुपये करण्यात आली आहे. म्हणजे यंत्रमागधारकांच्या वीजबिलात १ रुपये प्रतियुनिट अधिकची सवलत मिळेल. त्याचबरोबर २०० अश्‍वशक्तीच्या पुढे वीजभार असणाऱ्या आधुनिक यंत्रमाग ग्राहकांनासुद्धा सवलत मिळणार आहे.

त्याचबरोबर राज्यातील सूतगिरण्यांना प्रचलित वीज दरात ३ रुपये प्रतियुनिट सवलत देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात सूतगिरण्या, सायझिंग, प्रोसेसिंग, निटिंग, तसेच गारमेंट व इतर प्रकल्पांना प्रथमच वीज दरात सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे या उद्योग घटकांना नागपूर वस्त्रोद्योग संचालक यांच्या वेबसाइटवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. त्यामध्ये चालू उद्योग घटक, तसेच या धोरणांतर्गत नव्याने नोंदणी होणाऱ्या उद्योग घटकांनासुद्धा वीजदरातील सवलत लागू राहणार आहे. या नोंदणीची वेबसाइट येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होणार आहे. यंत्रमाग वीजग्राहकांना पूर्वीपासूनच सबसिडी देण्यात येत असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे नोंदणी करण्याची गरज नाही. 

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार पणन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह वित्त, ऊर्जा व वस्त्रोद्योग विभागाच्या अनेक बैठका पार पडल्या. अखेर मुख्यमंत्र्यांच्या अंतिम निर्देशानंतर हा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल.

राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना, तसेच सायझिंग प्रोसेसिंग गारमेंट युनिटला साधारण सध्या प्रतियुनिट साडेनऊ रुपयांच्या आसपास वीज दर आकारला जातो. या निर्णयामुळे विविध कारणांने अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...