agriculture news in marathi, Girna dam water reached Jalgaon border | Agrowon

गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

जळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर वाघूर धरणातून दोन आवर्तने सोडली जाणार आहेत. वाघूर धरणातून पाणी सोडण्यासंबंधी प्रशासन लवकरच जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेईल. गिरणा धरणातून मागील आठवड्यात नदीत पिण्याचे पाणी व कूपनलिका, विहिरींच्या पुनर्भरणासंबंधी आवर्तन सोडले असून, हे पाणी जळगाव तालुक्‍याच्या हद्दीत दाखल झाले आहे, अशी माहिती मिळाली.

जळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर वाघूर धरणातून दोन आवर्तने सोडली जाणार आहेत. वाघूर धरणातून पाणी सोडण्यासंबंधी प्रशासन लवकरच जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेईल. गिरणा धरणातून मागील आठवड्यात नदीत पिण्याचे पाणी व कूपनलिका, विहिरींच्या पुनर्भरणासंबंधी आवर्तन सोडले असून, हे पाणी जळगाव तालुक्‍याच्या हद्दीत दाखल झाले आहे, अशी माहिती मिळाली.

हतनूर धरणातून रब्बीसाठी तीन आवर्तनांची मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. तसा ठराव पाटबंधारे विभागाकडे या शेतकऱ्यांनी दिला आहे. हतनूरमध्ये १०० टक्‍के जलसाठा होता. तो घटला असून, ९० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. धरणात गाळ अधिक असल्याने जलसाठा पुरेसा नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु यंदा शेतकऱ्यांची मागणी व आवर्षणप्रवण स्थिती लक्षात घेता तीन आवर्तनांच्या मागणीवर शेतकरी ठाम असून, शेतकऱ्यांची मागणी प्रशासन मंजूर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील आठवड्यात हतनूरमधून रब्बीसाठी आवर्तन सोडले जाईल, असे सांगण्यात आले.

हतनूर धरणातील पाण्याचा लाभ चोपडा, रावेर, यावल या तालुक्‍यांना अधिक होतो. हतनूरमधून पिण्याच्या पाण्यासाठी व औद्योगिक वापरासाठीदेखील आवर्तन सोडावे लागते.

वाघूर धरणात सध्या ४२ टक्के जलसाठा आहे. या धरणातून रब्बीसाठी तीन आवर्तने सोडणे शक्‍य नाही. कारण औद्योगिक वापरासह जळगाव व जामनेर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वाघूरवर अवलंबून आहे. पण भुसावळ व जळगाव तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन रब्बीसाठी पाण्याची मागणी केली.

जिल्हा परिषदेचे सदस्य लालचंद पाटील, मिलिंद चौधरी, राजेंद्र चौधरी, धनराज कोल्हे, शंकर शिंदे आदींनी जिल्हाधिकारी यांच्याशी रब्बीच्या पाण्यासंबंधी चर्चा केली. त्यावर जलसंपदा विभागाशी लवकरच चर्चा करून रब्बीसाठी पाणी सोडले जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले असून, दोन आवर्तने रब्बीसाठी हतनूरमधून मिळतील, अशी माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...