मच्छीमारांसाठी अद्ययावत ‘जीआयएस` प्रणाली
वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कोची (केरळ) ः येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी देशभरातील मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) विकसित केली आहे.

संस्थेचे संचालक डॉ. ए. गोपालकृष्णन म्हणाले, की या प्रणालीमध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल या सर्व राज्यांतील १,२७८ केंद्रांची नोंद ठेवलेली आहे. त्यामुळे किनारपट्टी असलेल्या सर्व राज्यातील मासेमारी केंद्रांची माहिती एकाच ठिकाणी सर्वांना उपलब्ध झालेली आहे.

कोची (केरळ) ः येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी देशभरातील मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) विकसित केली आहे.

संस्थेचे संचालक डॉ. ए. गोपालकृष्णन म्हणाले, की या प्रणालीमध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल या सर्व राज्यांतील १,२७८ केंद्रांची नोंद ठेवलेली आहे. त्यामुळे किनारपट्टी असलेल्या सर्व राज्यातील मासेमारी केंद्रांची माहिती एकाच ठिकाणी सर्वांना उपलब्ध झालेली आहे.

या प्रणालीमुळे विविध किनारपट्टीच्या भागात कोणत्या माशांची उपलब्धता आहे, माशांच्या जातींमधील विविधता, माशांची प्रजनन ठिकाणे, माशांची उपलब्धता याची माहिती नोंदविली जाते. या नोंदीवरून येत्या काळात माशांच्या कोणत्या जाती कमी होत आहेत, याची माहिती जमा होऊन त्यांच्या संवर्धनासाठी विशेष उपक्रम हाती घेणे शक्य होणार आहे. प्रत्येक समुद्र किनाऱ्यानुसार माशांच्या जातींच्या उपलब्धतेचे नकाशे तयार केले जात आहेत.

प्रणालीच्या माध्यमातून समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना देशभरातील सुरक्षित किनाऱ्यांची माहिती मिळणार आहे. या प्रणालीमुळे संबंधित समुद्र किनाऱ्याजवळ मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना परिसरातील मत्स्य उत्पादनाची स्थिती, जवळपासचे किनारे यांची तत्काळ माहिती मिळणे सोपे जाणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीत ही प्रणाली मच्छीमारांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. या प्रमाणीमुळे समुद्रातील कोणत्या भागात मच्छीमार आहेत, जवळचे संपर्क केंद्र कोणते आहे, याची तात्काळ माहिती नौसेना तसेच मच्छीमारांना मिळेल. समुद्र किनारपट्टीवरील संशयास्पद हालचालींची तातडीने माहिती नौसेनेला मिळणार आहे. मच्छीमारांच्या बरोबरीने देशाच्या सुरक्षिततेसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणारी आहे.
 

इतर टेक्नोवन
फवारणी यंत्राच्या कल्पक निर्मितीतून वेळ...एकीकडे शेतीत यांत्रिकीकरण वाढत आहे, तर दुसरीकडे...
रब्बी हंगामासाठी सुधारित अवजारेरब्बी हंगामाचा विचार करता मजुरांची उपलब्धता व...
मोल निचरा पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीरजमिनीत चिकणमातीचे प्रमाण ३५ टक्‍क्‍यांपेक्षा...
तासाचे काम ७ मिनिटांत करणारा ‘पेपरपॉट...जपान येथील खासगी कंपनीने रोपांच्या लागवडीसाठी...
भूमिगत निचरा पाइपची योग्य खोली आवश्‍यकक्षारपड व पाणथळ जमिनीतून पाण्याचा निचरा...
सोलर वॅक्स मेल्टरमेणबत्ती अणि काड्यापेटीनिर्मिती उद्योगात मेण...
ट्रेंड भाजीपाला, फळे विक्रीचा...चांदणी, मुखवट्याच्या आकारात फळे, भाज्यांचे...
सेन्सरद्वारे अोळखता येते सिंचनाची नेमकी...वनस्पती आधारित सेन्सरच्या साह्याने पानांची जाडी...
मच्छीमारांसाठी अद्ययावत ‘जीआयएस` प्रणालीकोची (केरळ) ः येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य...
पेरणी ते काढणी यंत्राद्वारे ८० एकर...गरज ही शोधाची जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
भात पिकातील आंतरमशागतीसाठी कोनोविडर...भात पिकाची आंतरमशागत चिखलातच करावी लागते. त्याला...
शेवग्यापासून बनवा विविध मूल्यवर्धित...शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते....
केंद्रेकर यांच्या प्रयत्नांमुळे...पुणे : राज्यातील ट्रॅक्टर उत्पादक कंपन्या...
बावीस एकरांत शंभर टक्के ‘ड्रीप अॅटोमेशन’नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील रतन आनंदराव...
स्ट्रॉबेरी फळांवरील घरगुती प्रक्रियास्ट्रॉबेरी हे थंड हवामानातील पीक असले तरी अलीकडे...
कांदा प्रतवारी, लोडिंग-अनलोडिंग यंत्र...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
स्वस्तात बनविला छोटा पॉवर टिलरपाचोरा (जि. जळगाव) येथील मोटारसायकल दुरुस्तीचे...
साबळे यांची १६० एकरांवरील यांत्रिकी...शेती, मग ती अल्प असली तरी महागाईच्या व...