agriculture news in Marathi, Give 600 rupees subsidy for sugarcane harvest and 150 rupees for Export | Agrowon

ऊस गाळपास प्रतिटन ६०० रुपये, साखर निर्यातीस १५० रुपये अनुदान द्या
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

सांगली: साखर दरातील घरसणीमुळे साखर कारखाने अडचणीत आहेत. कारखाने टिकण्यासाठी राज्य शासनाने ऊस गाळपाला प्रतिटन ६०० रुपये अनुदान आणि केंद्र शासनाने निर्यातीसाठी प्रतिटन १५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी साखर कारखाना अध्यक्ष, प्रतिनिधींच्या वतीने करण्यात आली. 

सांगली: साखर दरातील घरसणीमुळे साखर कारखाने अडचणीत आहेत. कारखाने टिकण्यासाठी राज्य शासनाने ऊस गाळपाला प्रतिटन ६०० रुपये अनुदान आणि केंद्र शासनाने निर्यातीसाठी प्रतिटन १५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी साखर कारखाना अध्यक्ष, प्रतिनिधींच्या वतीने करण्यात आली. 

जिल्हा बॅंकेत गुरुवारी (ता. १७) याबाबत बैठक आयोजित केली होती. राज्यातील सर्व साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आहेत. ९० दिवसांच्या पुढे कारखाने ‘एनपीए’त जातील. यामुळे कारखान्यांसह बॅंकाही अडचणीत सापडतील. रिझव्हॅ बॅंकेने एनपीए धोरण बदलासाठी नाबार्ड, राज्य सहकारी बॅंक आणि लोकप्रतिनिधींच्या रेट्याची गरज असल्याची मतेही व्यक्त झाली.

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. २०१८-१९ च्या हंगाम तयारीसाठी लागणाऱ्या पूर्व हंगामी कर्ज उपलब्धतेबाबत जिल्हा बॅंकेत बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेचा वृत्तांत जिल्हा बॅंकांचे प्रतिनिधी राज्य सहकारी बॅंकांसमोर मांडणार आहेत. ही बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. बॅंकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रतापसिंग चव्हाण, सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग, जिल्ह्यातील सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मोहनराव कदम, जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक उपस्थित होते.

बैठकीतील चर्चा...

  • देशात ३१६ लाख टन उत्पादन, अपेक्षित २८५ लाख टन   
  •  नाव्हेंबरचा दर ३५०० ते ३६०० रुपये
  • सध्याचा दर २३५०
  • जागतिक बाजारपेठेतील दर १८५० ते १९००
  • सांगली, कोल्हापुरातील ८५ टक्के साखर शिल्लक
  • शॉर्ट मार्जिनमधील कारखान्यांवर १ टक्के अतिरिक्त दंड

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...