agriculture news in marathi, Give clearance of deprived farmers from Tur Repurchase scheme | Agrowon

तूर नोंदणीपासून वंचित ठेवल्याचा खुलासा द्या
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

नगर : शेवगाव बाजार समितीअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय तूर खरेदी केंद्राच्या शासन नियुक्त सहकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये कागदपत्रे देऊनही ऑनलाइन नोंदणी न करता शासकीय तूर विक्रीपासून वंचित ठेवले असल्याच्या तक्रारी बोधेगाव व अधोडी (ता. शेवगाव) येथील शेतकऱ्यांनी सहायक निबंधकांसह पणनमंत्र्यांकडे केल्या होत्या. या तक्रारीवरून बाजार समितीच्या सचिवांना लेखी खुलासा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

नगर : शेवगाव बाजार समितीअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय तूर खरेदी केंद्राच्या शासन नियुक्त सहकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये कागदपत्रे देऊनही ऑनलाइन नोंदणी न करता शासकीय तूर विक्रीपासून वंचित ठेवले असल्याच्या तक्रारी बोधेगाव व अधोडी (ता. शेवगाव) येथील शेतकऱ्यांनी सहायक निबंधकांसह पणनमंत्र्यांकडे केल्या होत्या. या तक्रारीवरून बाजार समितीच्या सचिवांना लेखी खुलासा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

शेतीमालाला हमीभाव मिळावा व व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबावी या उद्देशाने शासन निर्णयानुसार शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील जगदंबा महिला सहकारी संस्थेमार्फत सुरू असलेल्या तूर खरेदीत वंचित ठेवल्याचा प्रकार नुकताच उघड झाला होता. बोधेगाव येथील दत्तात्रय घोरतळे, सुभाष घोरतळे, परमेश्वर तांबे, भागवत घोरतळे, साईनाथ पोटभरे, नितीन घोरतळे आदी शेतकऱ्यांनी संस्थेच्या आखेगाव रस्त्यावरील कार्यालयात तूर विक्रीकरतिा ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी कागदपत्रे दिले. त्या वेळी त्यांना संबधितांनी पोच देण्यास नकार दिला होता.

तूर आणण्यासाठी खरेदीचा दिनांक व वेळेची माहिती मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे न आल्याने तीन मे रोजी शेतकऱ्यांनी संस्थेकडे चौकशी केली असता नोंदणी न झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवगाव येथील सहायक निबंधकांकडे लेखी तक्रार दिली होती. त्यांनी सदर निवेदनाच्या प्रती कृषी व पणनमंत्री, महसूल व मदत पुनर्वसनमंत्री, पणन संचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, तहसीलदार आदींनाही पाठवल्या होत्या. याबाबत ‘ॲग्रोवन’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे सहायक निबंधकांनी दखल घेऊन शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांकडे तक्रारीच्या अनुषंगाने सहकारी संस्था कार्यालयास खुलासा मागवला आहे. आता याबाबत काय कारवाई होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...