agriculture news in marathi, Give declared bill to sugarcane warns Raju shetti | Agrowon

जाहीर केलेला हप्ता द्या ः राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : कोल्हापुरातील साखर कारखान्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यात कपात करून प्रतिटन २५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. याचा तीव्र विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी (या.१७) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कारखान्यांनी जाहीर हप्ता दिला नाही, तर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी या वेळी दिला.

कोल्हापूर : कोल्हापुरातील साखर कारखान्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यात कपात करून प्रतिटन २५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. याचा तीव्र विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी (या.१७) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कारखान्यांनी जाहीर हप्ता दिला नाही, तर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी या वेळी दिला.

श्री. शेट्टी म्हणाले, की कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी साखरेच्या दराचे कारण पुढे करून बेकायदा शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून प्रतिटन सरासरी ५०० रुपये कपात करून खात्यावर प्रतिटन २५०० रुपये बहुसंख्य कारखान्यांनी वर्ग केले आहे. नोव्हेंबर महिन्यात ऊस आंदोलन पेटल्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने एफआरपी + २०० रुपये असा सर्वाच्या अनुमते निर्णय घेण्यात आलेला होता. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी परस्पर बैठक घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कपातीची घोषणा केली. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखरेचे दर कोसळले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना २०० कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना एक रुपयाही कमी घेणार नाही. साखरेचे दर पाडण्यास सरकारी धोरण कारणीभूत आहे. प्रत्येक वेळी आमच्यावरच अन्याय का. साखर कारखान्यांनी जेवढी पहिली उचल ठरलेली आहे, तेवढी रक्कम शेतकऱ्यांना दिली पाहिजे. 

‘‘ठराविक साखर कारखानदार आणि सरकार यांच्या मिलीभगतमुळेच साखरेचे दर पाडले गेले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या किती साखर साखर कारखान्यांवर आपण कारवाई केली आहे, याचा लेखी खुलासा त्वरित करावा, तसेच ज्या साखर कारखान्यांनी कपात केली आहे, त्या साखर कारखान्यांवर त्वरित कडक कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर विनाकपात बिल अदा करण्यात यावे. याचा निर्णय त्वरित झाला नाही, तर शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल,’’ असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. या वेळी सावकार भगवान काटे, सावकार मादनाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...