agriculture news in marathi, Give five thousand rupees per acres for Soya bean | Agrowon

'सोयाबीनला एकरी पाच हजार रुपये अनुदान द्या'
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

अकोला : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने सोयाबीन उत्पादकांना एकरी पाच, तर कापूस उत्पादकांना क्विंटलला १५०० रुपये अनुदान दिले जावे, अशी मागणी येथील खासदार संजय धोत्रे, अामदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली अाहे.

अकोला : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने सोयाबीन उत्पादकांना एकरी पाच, तर कापूस उत्पादकांना क्विंटलला १५०० रुपये अनुदान दिले जावे, अशी मागणी येथील खासदार संजय धोत्रे, अामदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली अाहे.

या वर्षी खरीप हंगामातील पिकांना लहरी पावसामुळे मोठा फटका बसल्याने उत्पादन घटले आहे. विशेषतः सोयाबीनचे नुकसान अधिक झाले आहे. त्यामुळे शासकीय खरेदी तसेच मिळणारा बोनस इत्यादी लाभांपासून शेतकरी नाइलाजाने वंचित राहिला आहे. शेतकऱ्याला आर्थिक संकटातून बाहेर  काढावे, याकरिता खासदार, अामदारांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.

शेतकऱ्यांच्या पेरे पत्रकानुसार शेतकऱ्यांना प्रतिएकर पाच हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून केली. त्याबरोबर खरिपातील तूर, मूग, कपाशी इत्यादी उत्पादनाला जास्तीत जास्त बोनस देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत खासदार संजय धोत्रे यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करण्याचे अाश्‍वासन दिले.

या वर्षी सोयाबीन पिकाला केंद्र शासनाचा हमीभाव २८५० अधिक बोनस २०० रुपये असा ३०५० प्रतिक्विंटल भाव असताना बाजारात प्रत्यक्ष सरासरी २३०० रुपये प्रतिक्विंटलचे भाव आहेत. परिस्थिती लक्षात घेता राज्यात हमीभाव अधिक ५०० रुपये प्रतिक्विंटल बोनस देण्याची मागणी आमदार सावरकर यांनी केली अाहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...