agriculture news in Marathi, Give the full FRP in eight days; Otherwise the movement | Agrowon

आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा आंदोलन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी या वर्षीच्या गळीत केलेल्या उसाची तेथील शेतकऱ्यांना साखरेचे दर वाढल्याने एफआरपीची पूर्ण रक्कम द्यायला सुरवात केली आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने येथील शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपीची रक्कम दिलेली नाही. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपीची पूर्ण रक्कम दिली नाही, तर सर्व कारखान्यांवर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन स्वाभिमानी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. 

सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी या वर्षीच्या गळीत केलेल्या उसाची तेथील शेतकऱ्यांना साखरेचे दर वाढल्याने एफआरपीची पूर्ण रक्कम द्यायला सुरवात केली आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने येथील शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपीची रक्कम दिलेली नाही. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपीची पूर्ण रक्कम दिली नाही, तर सर्व कारखान्यांवर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन स्वाभिमानी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. 

या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होताना स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील कारखान्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत एफआरपी अधिक दोनशे रुपये दर जाहीर केला होता, परंतु त्यानंतर प्रत्यक्षात उसाची बिले देण्यास दोन महिने विलंब करून साखरेचे दर पडल्याचे कारण सांगत एकरकमी एफआरपीचा कायदा पायदळी तुडवून एफआरपीचे तुकडे केले. 

शेतकऱ्यांना प्रतिटन २२०० ते २५०० रुपयांपर्यंत पहिला हप्ता दिला आहे. आज साखरेचे किमान विक्रीदर ३१०० रुपये झाला आहे. त्याशिवाय गेल्या चार महिन्यांपूर्वी कारखाने सुरू झाल्याने आजपर्यंत विक्री केलेली मळी, बगॅस, अल्कोहोल, इथेनॉल, वीज व इतर उपपदार्थांचे पैसे कारखान्यांकडे शिल्लक आहेत. तसेच राज्य बँकेने साखरेचे मूल्यांकन वाढवलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखांदारांना शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीची रक्कम देण्यात कोणतीही अडचण नाही. साखरेचे दर कमी झाल्यावर ऊस दर कमी देणारे कारखानदार साखरेचे दर वाढल्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला वाढीव दर देत नाहीत. मार्च महिना जवळ आल्याने शेतकऱ्यांना विविध बँका, पतसंस्था, सोसायटी यांची थकीत कर्जे भरायची आहेत. 

शेतीच्या मशागतीसाठी घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे. जर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने आताच्या साखर दराने शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देऊ शकत असतील, तर जिल्ह्यातील कारखाने का देऊ शकत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पूर्ण एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना या कारखादारांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...