agriculture news in marathi, give help from Shikhar bank for destribute Debt to Farmer | Agrowon

शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी शिखर बॅंकेची मदत घेणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

सोलापूर : ‘‘जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज वाटप करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी शिखर बॅंकेची मदत घेऊ. त्याशिवाय थकबाकी वसुलीसाठीही विशेष मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांसह ३६ सहकारी संस्थांकडे कर्जापोटी ९६२ कोटी २२ लाख रुपये थकीत आहेत. त्याच्या वसुलीची कारवाई सुरू असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पैशाचा प्रश्‍न सुटेल. यापुढे शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल,`` असे बॅंकेचे प्रशासक अविनाश देशमुख यांनी सांगितले.

सोलापूर : ‘‘जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज वाटप करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी शिखर बॅंकेची मदत घेऊ. त्याशिवाय थकबाकी वसुलीसाठीही विशेष मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांसह ३६ सहकारी संस्थांकडे कर्जापोटी ९६२ कोटी २२ लाख रुपये थकीत आहेत. त्याच्या वसुलीची कारवाई सुरू असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पैशाचा प्रश्‍न सुटेल. यापुढे शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल,`` असे बॅंकेचे प्रशासक अविनाश देशमुख यांनी सांगितले.

जिल्हा बॅंकेची १०० वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या वेळी माजी आमदार धनाजी साठे, बॅंकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे, ‘नाबार्ड`चे प्रदीप झिले, सहायक व्यवस्थापक के. आर. पाटील आदी उपस्थित होते.

 देशमुख म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील साखर कारखाने, गूळ उत्पादक कारखाने, सूत गिरण्या, शैक्षणिक संस्था, प्रक्रिया उद्योग, पगारदार संस्था, राज्य बॅंकेचा सहभाग असलेल्या संस्था व तीन इतर संस्था यांच्याकडे कर्जाची ५४३ कोटी, तर व्याजाची ४१९ अशी एकूण ९६२ कोटी रुपये रक्कम थकीत आहेत. यामध्ये वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. वसुलीसाठी न्यायालयासह अन्य यंत्रणाकडे पाठपुरावा सुरू आहे.

जिल्हा बॅंकेने यंदा मागील वर्षापेक्षा अधिक कर्जाचे वाटप केले आहे. २८४ कोटीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १८२ कोटीचे कर्जे दिली आहेत. मागील वर्षी १२५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. यंदाच्या वर्षात बॅंकेला ३.६८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. पण अनुत्पादक कर्जाचे एनपीएप्रमाणे वाढल्याने बॅंकेला कागदोपत्री २७. ५४ कोटी रुपयांचा तोटा दिसतो. एनपीएमध्ये ३०.५४ कोटी रुपये जमा केल्याने तोटा वाढला आहे, असेही ते म्हणाले. या वेळी बॅंकेच्या नफा-तोटा पत्रकाचे वाचन करण्यात आले. तसेच त्यावरील कार्यवाहीची माहिती देण्यात आली.

इतर बातम्या
खानदेशात दुष्काळ निवारणात अडचणीजळगाव : दुष्काळी व पिण्याच्या पाण्याची तीव्र...
सरपंच परिषदेची ताकद दाखवू नगर  ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी...
संत्रा, मोसंबी बागांचे नव्याने सर्वेक्षणनागपूर : जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्‍वर...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
‘अक्कलपाडा’चे पाणी न पोचल्याने...धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत...
नानेगावकरांचा ग्रामसभेतून प्रस्तावित...नाशिक : नाशिक पुणे प्रस्तावित रेल्वे महामार्ग...
सोलापूर जिल्ह्यातील खरीप नुकसानीपोटी ३८...सोलापूर : खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील...
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची...पांगरी, जि. सोलापूर : बार्शी तालुक्यातील पूर्व व...
नागालँड राज्य बँक राबविणार पुणे जिल्हा...पुणे ः शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी पुणे जिल्हा...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप वेगातसातारा ः जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
पुणे विभागात दहा लाख हेक्टर क्षेत्र...पुणे ः पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांच्या...
शेतकरी सन्मान योजनेसाठी सात हजार...उस्मानाबाद ः तालुक्‍यातील २४ गावांतून सात हजार...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...