agriculture news in marathi, give incentive for milk powder, mumbai, maharashtra | Agrowon

दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 जुलै 2018

इस्लामपूर, जि. सांगली  ः दूध पावडरसाठी प्रतिकिलो ५० रुपये व दूध उत्पादकास प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य दूध संघ कृती समितीने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली.

इस्लामपूर, जि. सांगली  ः दूध पावडरसाठी प्रतिकिलो ५० रुपये व दूध उत्पादकास प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य दूध संघ कृती समितीने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली.

शुक्रवारी (ता. २९) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की राज्य दूध संघ कृती समितीतर्फे दूध व्यवसायातील समस्यांवर चर्चा झाली. खासगी व सहकारी दूध संघांकडे ४० हजार टन दूध पावडर व दहा हजार टन बटर शिल्लक आहे. बाजारपेठेत १०० रुपये प्रतिकिलो कमी दर मिळत आहे. ग्राहकांकडून मागणीही नाही. राज्यातील दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला आहे. स्थिती अशीच राहिल्यास व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. पावडरला ५० रुपये व बटरसाठी ७५ रुपये प्रतिकिलो अनुदान व निर्यातीस प्रोत्साहन म्हणून २० टक्‍के इन्सेंटिव्ह मिळण्याची मागणी केली आहे.

राज्याने मागणी मान्य केल्यास दूध पावडर व बटरचा साठा संपेल. नव्याने निर्मिती केलेला साठाही विकला जाईल. पावडर व बटरमुळे शीतगृहे व गोदामे १०० टक्के भरलीत. अनुदान मिळाल्यास ती रिकामी होतील. यापुढे व्यवसायाला चांगले दिवस येतील म्हणून दुग्ध उत्पादकांसाठी अनुदानाची मागणी श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली केली. श्री. पवार व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी लवकरच दूध उत्पादकांच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याचे सूचित केले आहे.

गोपाळराव मस्के, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विनायक हिंगे, व्यवस्थापक डॉ. विवेक क्षीरसागर, ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, जनरल मॅनेंजर आर. सी. शहा, सोनाई परिवाराचे दशरथ माने, चितळे डेअरीचे श्रीपाद चितळे व शासनाचे प्रमुख अधिकारी किरण कुरुंदकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. संचालक शशिकांत पाटील, कार्यकारी संचालक सुरेश पटेल या वेळी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...