दूधउत्पादक जगेल, एवढा तरी दर द्या
दूधउत्पादक जगेल, एवढा तरी दर द्या

दूधउत्पादक जगेल, एवढा तरी दर द्या

पुणे : दूध खरेदीचे दर आणि विक्रीचे दर यात मोठी तफावत आहे. हा सर्व नफा वितरक खात आहेत. ही तफावत कमी करून किमान शेतकरी जगेल एवढा तरी दर दिला पा.िहजे. तसेच, परराज्यातील विक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी दुधाची विक्री किंमत कमी केली पाहिजे. वेळप्रसंगी परराज्यांतून येणाऱ्या दुधाचे टॅंकर अडवावे, अशी मागणी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत करण्यात आली. दूध व्यवसायातील अडचणींबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला.   दूध व्यवसायासमेारील अडचणींवर मात करण्यासाठी गुरुवारी (ता. १०) कात्रज डेअरी येथे बैठकीचे आयाेजन करण्यात आले होते. संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, उपाध्यक्ष गोपाळराव मस्के, ख.िजनदार डाॅ. विवेक क्षीरसागर, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, शिवामृत दूधचे धैर्यशील मोहिते-पाटील, ऊर्जा दूधचे प्रकाश कुतवळ, चितळकर मिल्कचे दादासाहेब चितळकर, कृष्णाई डेअरीचे सदाशिव पाचपुते, हॅप्पी काऊचे शरद गरोडीया आदी उपस्थित होते.   संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले, ‘‘दुधाला २७ रुपये दर देण्यासाठी राज्य सरकारकडून सक्ती होत आहे. यासाठी सरकारकडून कारवाईची भीती दाखवली जात आहे. मात्र, हा दर देण्यासाठी दूध संस्थांना होणारा तोटा कसा भरून काढता येईल, यासाठी माजी केंद्रीय कृ.िषमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांची भेट घेऊ.’’  दुधाचे विक्री दर कमी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना संघाचे पाटील यांनी मांडली.     प्रकाश कुतवळ म्हणाले, ‘‘शेतकऱ्याला अापण प्रति.िलटर १७ ते २० रुपये दर देतो, तर विक्रीचा दर ४२ रुपये आहे. हा सर्व नफा वितरक खात आहेत, त्यामुळे गैरसमज वाढले आहेत. आपण शेतकऱ्याला २७ रुपये दर देऊ शकत नसू, तर विक्रीची किंमत कमी केली पाहिजे. दुसरीकडे दूध खरेदीला एवढा कमी दर देणे योग्य नाही, किमान शेतकरी जगला पाहिजे एवढा दर दिला पाहिजे. शेतकऱ्यांना परवडेल असा दर जाहीर केला जावा.’’ डॉ. क्षीरसागर म्हणाले, ‘‘राज्य सरकारकडून सहकारी संघांना दुधाला २७ रुपये प्रति.िलटर दूध देण्याची सक्ती केली जात आहे. यासाठी संघांना संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या नोटीस काढल्या आहेत. भुकटीचा दर कोसळल्याने दूध संस्था प्रति.िलटर ८ ते १० रुपये तोट्यात आहेत. यातच २७ रुपये दर दिल्यास संघ तोट्यात जातील, याची जबाबदारी संचालक मंडळावर येईल. राज्यात ४० हजार टन दूध भुकटी पडून अाहे. दूध भुकटीला तीन रुपये अनुदान देण्याची घोषणा केली; मात्र त्यासाठी २७ रुपये दर देण्याचा आग्रह धरला जाईल. तीन रुपये अनुदान देऊनही उर्व.िरत ५ ते ७ रुपयांचा तोटा कसा भरून निघेल, हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे.’’  धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, ‘‘दूध व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये दूध संस्थांना दूध गोळा करणारे आणि दुधाची विक्री करणारे दोन्ही घटक ब्लॅकमेल करीत आहेत. अशा वेळी सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. संपूर्ण राज्यासाठी एकच मार्केटिंग ब्रॅंड केला पाहिजे. दूध व्यवसायासमोरील अडचणी सोडविण्यासाठी संघ घेईल त्या निर्णयाला पाठिंबा दिला जाईल.’’ महानंदचे के. डी. पाटील म्हणाले, ‘‘सरकारला काही कळत नसून, कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे राज्यात गोंधळाची स्थिती आहे. २७ रुपये दर देण्याच्या निर्णयामुळे महानंदवर ४६ लाख रुपयांचा अतिरिक्त बाेजा पडला आहे. अमूल, नं.िदनी परराज्यातील दुधाला शह देण्यासाठी राज्यातील दुधाचे विक्री दर कमी केले पाहिजेत.’’ गरोडीया यांनी न्यायालयात दाद मागण्याची भूमिका मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com