agriculture news in marathi, Give the price of sugar, molasses, and bugasses together | Agrowon

साखर, मोलॅसिस, बगॅसची किंमत एकत्र करून दर द्या
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

चालू हंगामातील कालच्या या बैठकीनंतर आता हंगामाच्या शेवटी ऊसदर नियंत्रण समितीची पुन्हा बैठक होणार आहे. या प्रकरणात तोपर्यंत राज्य सरकारने साखर कारखान्यांवर कारवाई न केल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची आमची तयारी आहे.
- रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना

मुंबई : उसाची प्रथम उत्पादने असलेल्या साखर, मोलॅसिस आणि बगॅसची एकत्रित किंमत धरून ७०ः३० च्या सूत्रानुसार उसाला दर द्यावा, अशी आग्रही मागणी राज्यातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी बुधवारी ऊसदर नियंत्रण समितीच्या बैठकीत केली. मोलॅसिस आणि बगॅसची किंमत धरली जात नसल्याने शेतकऱ्यांना टनामागे एक ते दीड हजारांचा तोटा सहन करावा लागतो आहे. तसेच देशभरात साखरेचे दर सारखेच असताना राज्याराज्यांमध्ये उसाला वेगळा दर का यावर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभे करतानाच कारखानदार हिशेबात चुका करून संगनमताने भ्रष्टाचार करतात, त्याला सरकारचीही साथ असते, असा आरोपही करण्यात आला आहे.

ऊसदर नियंत्रण समितीची बैठक बुधवारी (ता. ८) मंत्रालयात झाली. राज्याचे मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. एस. संधू, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के .जैन, साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांच्यासह खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील आणि साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत साखर कारखानदारांकडून दिल्या जात असलेल्या ऊस दरावरून शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकार आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरल्याचे समजते. राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखानदार ७०ः३० च्या सूत्रानुसार दर देताना फक्त साखरेची किंमत विचारात घेतात. या सूत्राचा ऊस उत्पादकांना फटका सहन करावा लागतो. शेजारील गुजरातच्या तुलनेत राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे एक ते दीड हजार रुपये कमी दर मिळतो. त्यामुळे साखरेसोबत मोलॅशिस आणि बगॅसची किंमत धरून ऊसदर द्यावा, अशी मागणी संघटनांच्या नेत्यांनी केल्याचे समजते. कारखानदार बगॅस, मोलॅशिसचा वापर इंधनासाठी केला जातो असे सांगतात.

प्रत्यक्षात, साखर कारखानदार याची विक्री करतात, आणि इंधनासाठी स्वतंत्र खर्च करतात हे कारखान्यांच्या वार्षिक अहवालातून दिसून येत असल्याचे शेतकरी नेत्यांनी पुराव्यांसह यावेळी बैठकीत निदर्शनाला आणून दिले. मोलॅशिसचा दर न धरल्याने टनामागे सहाशे रुपये आणि बगॅसचा दर न धरल्याने टनामागे सुमारे तीनशे रुपये शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. देशभरात साखरेचे दर सारखेच असताना राज्यां-राज्यांमध्ये ऊसाला वेगळा दर का यावर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कारखानदार हिशेबात चुका करून हा भ्रष्टाचार करतात, असा आरोप या बैठकीत शेतकरी नेत्यांनी केल्याचे सांगण्यात आले. सरकार, अधिकारी आणि कारखानदारांच्या याबाबतीत संगनमत असल्याची टीकाही काही नेत्यांनी यावेळी केली.

दरम्यान, या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्य सचिव सुमीत मलिक यांनी प्रशासनाला दिले. यावर कारखानदारांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, तसेच त्यांचे म्हणणे समाधानकारक नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शेतकरी नेत्यांना देण्यात आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...