agriculture news in marathi, Give proper compensation for crop Insurance : 'Swabhimani' demand | Agrowon

पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘स्वाभिमानी‘ची मागणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मार्च 2019

अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी परीस्थिती आहे. शेतकऱ्यांनी या वर्षी नियमानुसार पीकविमा काढला. मात्र कंपनीकडून तोकडी रक्कम दिली जात आहे. शासनाने याची दखल घेऊन योग्य मोबदला द्यावा, अन्यथा तहसीलचा ताबा घेण्यात येईल,  असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला. 

याबाबत शुक्रवारी (ता. २२) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेत्तृवात तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले. 

अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी परीस्थिती आहे. शेतकऱ्यांनी या वर्षी नियमानुसार पीकविमा काढला. मात्र कंपनीकडून तोकडी रक्कम दिली जात आहे. शासनाने याची दखल घेऊन योग्य मोबदला द्यावा, अन्यथा तहसीलचा ताबा घेण्यात येईल,  असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला. 

याबाबत शुक्रवारी (ता. २२) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेत्तृवात तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले. 

निवेदनानुसार, मागील वर्षी शासनाने मोठी जाहिरातबाजी करून शेतकऱ्यांना पीकविमा काढण्यास प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांनी पैसा नसल्याने उसनवार करून, व्याजाने पैसे काढून कापूस, सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचा विमा काढला. त्यातच पावसाने दांडी मारल्यामुळे सर्व पिके उद्ध्वस्त झाली. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग ही पिके हातातून निघून गेली. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर केला. 

पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना पीकविम्याची हेक्टरी ३००० ते ५००० एवढी तुटपुंजी मदत दिली. यातून शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक झाली. वास्तविक शासनाने दुष्काळ जाहीर करताच पीकविमा कंपन्यानी १५ दिवसांच्या आत पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करणे अनिवार्य असते. पंरतु या दुष्काळाच्या काळात सरकार मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायला तयार नाही.

 शेतकऱ्यांनी विमा काढलेल्या रकमेनुसार योग्य ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करावी, अन्यथा संघटनेतर्फे आक्रमक आदोलन करून तहसीलचा ताबा घेण्यात येईल, असे निवेदनात स्पष्ट केले आहे. 

निवेदनावर स्वाभिमानीचे युवा कार्यकर्ते रोशन देशमुख, तालुका अध्यक्ष योगेश मुरुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नारायण ढगे, प्रशांत खोडे, आशिष नादोकार, प्रवीण येनकर, संतोष गायकवाड, कपिल गायकी, विठ्ठल कापसे, संतोष तेल्हारकर, घनश्याम राठी, उज्ज्वल खराटे, मंगेश काळमेघ, प्रकाश भगत, स्वप्नील अवचार, श्रीकृष्ण बोरोकार, नारायण बावस्कार आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...