agriculture news in marathi, Give Reservation to farmers says Sharad Pawar | Agrowon

शेतकऱ्यांना आरक्षण द्या : शरद पवार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई : सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास जातवर्गांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा जसा विचार समाजमान्य होतो आहे. त्यामध्ये शेतकरी या चौथ्या घटकाचा समावेश केला पाहिजे, असे काही जाणकार मंडळींनी सुचवले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबण्यास मदत होईल. शेतकऱ्यांचे आरक्षण न्यायालयातही टिकेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.

 राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरच्या शासकीय निवासस्थानी पवार यांची मंगळवारी (ता.२७) पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये पवार यांनी शेतकरी आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका सविस्तर मांडली.

मुंबई : सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास जातवर्गांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा जसा विचार समाजमान्य होतो आहे. त्यामध्ये शेतकरी या चौथ्या घटकाचा समावेश केला पाहिजे, असे काही जाणकार मंडळींनी सुचवले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबण्यास मदत होईल. शेतकऱ्यांचे आरक्षण न्यायालयातही टिकेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.

 राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरच्या शासकीय निवासस्थानी पवार यांची मंगळवारी (ता.२७) पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये पवार यांनी शेतकरी आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका सविस्तर मांडली.

देशातील ८२ टक्के शेतकऱ्यांच्या जमिनीचे आकारमान २ हेक्टरच्या आत आहे. त्यातील ७० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. परिणामी, मागच्या दशकात शेतकऱ्यांची विपन्नावस्था वाढली आहे. शेती मोठी जोखमीची झाली आहे. शेतकरी घटकाला आरक्षण दिल्यास अनेक जात घटकांना त्याचा लाभ होईल. हे आरक्षण केवळ मराठा जातीपुरते नसेल. मुळात ते जातीच्या आधारावर असणार नाही. या आरक्षणामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील, असा अाशावाद त्यांनी व्यक्त केला.

मध्यंतरी पुण्यात राज ठाकरे यांनी माझी मुलाखत घेतली. त्यात माझा आर्थिक आरक्षणाला पाठिंबा असल्याचे मत पुढे आले. आर्थिक निकषावर आरक्षण असले पाहिजे, या मताचा मी आहे. मात्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्ग यांना राज्यघटनेने दिलेले आरक्षण कायम राहिले पाहिजे. त्यांच्या आरक्षणाला कोणताही हात न लावता इतर जातवर्गांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हरकत नाही. तसे आरक्षण राजस्थान आणि केरळमध्ये देण्यात आलेले आहे, असे पवार म्हणाले.

माझा आरक्षणाला विरोध असण्याचे कारण नाही. उलट मी राज्याचा मुख्यमंत्री असताना १९९२ मध्ये देशात सर्वप्रथम मंडल आयोगाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. महिलांना आरक्षण माझ्याच काळात दिले गेले आहे, याचे स्मरणही या वेळी पवार यांनी करून दिले.

इतर अॅग्रो विशेष
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...