जगात विक्रमी तृणधान्य उत्पादन यंदा शक्‍य
वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017
नवी दिल्ली ः पोषक वातावरण राहिल्याने यंदा (२०१७) जागतिक स्तरावर तृणधान्याचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचे संकेत अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) दिले आहेत.
 
यंदा तृणधान्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.८ दशलक्ष टनांनी वाढून २६१२ दशलक्ष टनांवर पोचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
नवी दिल्ली ः पोषक वातावरण राहिल्याने यंदा (२०१७) जागतिक स्तरावर तृणधान्याचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचे संकेत अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) दिले आहेत.
 
यंदा तृणधान्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.८ दशलक्ष टनांनी वाढून २६१२ दशलक्ष टनांवर पोचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
जागतिक स्तरावर तृणधान्याचा वापर यंदा २५८९ दशलक्ष टन राहील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २६ दशलक्ष टन अधिक तृणधान्याचा वापर राहणार आहे; तसेच शिल्लक साठा २०१८ च्या अखेरीस ७२०.५ दशलक्ष टनांवर पोचेल; तर जागतिक स्तरावर २०१७-१८ या वर्षात तृणधान्याचा व्यापार ४०३ दशलक्ष टन राहील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा होणारा व्यापार ०.४ टक्‍क्‍यांनी अधिक म्हणजे १.५ दशलक्ष टनांनी अधिक असेल, ‘एफएओने नमूद केले आहे.
 
जागतिक स्तरावर गहू उत्पादन ७५०.१ दशलक्ष टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. गहू पिकांसाठी पोषक हवामान राहील. विशेषतः युरोपीय देश आणि रशियातील उत्पादन वाढणार आहे.
 
जगातील काही भागांत सध्या गहू पेरणी सुरू झाली आहे. मात्र, युरोपातील काही भागांत कोरडे हवामान असल्याने पेरणी संथगतीने सुरू आहे. भरडधान्ये उत्पादन १३६१ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. चीन आणि अमेरिकेतील मका उत्पादनात सुधारणा होईल; तर रशियातील कोरडे हवामान राहिल्याने येथून अपेक्षित उत्पादन होणार नसल्याचे एफएओने म्हटले आहे.
 
मक्‍याचा व्यापार वाढण्याची चिन्हे
भरडधान्याच्या व्यापाऱ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १.२ टक्‍क्‍यांनी वाढ होईल. विशेषतः मक्‍याचा व्यापारात मोठी वाढ होणार आहे. मका व्यापारा ३.३ टक्‍क्‍यांनी वाढून १४३ दशलक्ष टनांवर पोचेल. चीन, युरोपीय देश आणि इराणकडून मोठ्या प्रमाणात मक्‍याची आयात राहणार आहे.
 
मक्‍याच्या वाढत्या व्यापाराचा अर्जेटिना, ब्राझील आदी देशांना फायदा होईल; तसेच तांदळाचा जागतिक व्यापार एक टक्‍क्‍याने वाढून ४५.२ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज एफएओने व्यक्त केला आहे.
 
जागतिक तृणधान्य मार्केट (दशलक्ष टनांमध्ये)
 
वर्ष 2013-14 2014-15 2015-16 2016-17 2017-18
उत्पादन 2519.6 2564.2 2532.5 2605.4 2612.2
पुरवठा 3051.4 3157.1 3186.4 3269.7 3314.4
वापर 2430.6 2501.6 2512.5 2563.2   2589.1
व्यापार 363.8 377.9 393.0 401.3 402.8
शिल्लक साठा 592.9 653.9 664.3 702.2 720.5

स्रोत ः एफएओ

इतर ताज्या घडामोडी
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...